लॅपटॉप सुरक्षा टिप्स | Laptop Security Tips Marathi

·

·

लॅपटॉप सुरक्षा टिप्स

लॅपटॉप सुरक्षा DNS

लॅपटॉप सुरक्षा (Laptop Security) मध्ये डीएनएस पण एक महत्वाचा घटक आहे. याने तुमच्या लॅपटॉपच्या सुरक्षेत लक्षणीय बदल घडतो. हे काय करतं? तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप इंटरनेट वरील वेबसाइटला त्यांच्या नावाने नाही तर एक आयपी ॲड्रेसने ओळखतो. जसं www.cyberbandhu.in या वेबसाइट ला तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल हा 192.0.2.1. अशा आयपी ॲड्रेसने ओळखतो.

हॅकर तुमच्या ब्राऊजरमध्ये काही बदल करून तुम्ही ज्यावेळी www.cyberbandhu.in हे टाइप कराल तेव्हा त्याच्या एखाद्या मॅलीशीयस वेबसाइटवर नेऊ शकतो. तर डीएनएस तुम्हाला यापासून वाचवतो. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये डीएनएस ॲड करून यापासून वाचू शकता. तुम्ही वापरत असलेल्या ब्राऊजर मध्ये जाऊन डीएनएस सर्च करा आणि तिथे तुम्हाला चार पर्याय मिळतील त्यापैकी कोणतेही एक डीएनएस सर्वर निवडा.

लॅपटॉपच्या सुरक्षेसाठी एक्सटेन्शन

तुम्हाला माहीत नसतील पण तुमच्या ब्राऊजर मध्ये खूप असे एक्सटेशन्स आहेत जे तुम्हाला धोकादायक वेबसाइटवर जाण्यापासून अडवतात. तुम्हाला फक्त ते क्रोम वेब स्टोर वरून ते इंस्टॉल करायचे आहेत. आणि हे सर्व एक्सटेंशन्स नामांकित अँटीव्हायरस कंपनीचे आहेत.

सेफ सर्च फीचर

तुम्ही कोणतेही ब्राऊजर वापरत असाल तर त्यामध्ये एक सेफ सर्च नावाचं एक फीचर मिळतं. ते चालू करा म्हणजे तुमचा लॅपटॉप सुरक्षित राहण्यास मदत होईल.

डार्क वेब

खूपदा काही कंपन्यांचे डेटाबेस हॅक होतात यामध्ये तुमची माहिती जसे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासवर्ड ही लीक होते. अन् अशी माहिती ही डार्क वेबवर असते इथून मग कोणीही ती माहिती खरेदी करून त्याचा गैरवापर करू शकतो. यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमची कोणती माहिती ही डार्क वेब वर आहे. जर तुमची ईमेल आयडी ही डार्क वेब वर असेल तर लगेच तुमचा पासवर्ड बदलून घ्या, जर तुम्ही तो अजून बदलेला नसेल तर.

have i been pwned?

विंडोज

तुम्ही जर विंडोज पीसी किंवा लॅपटॉप वापरत असाल तर एक दिलासादायक गोष्ट आहे. तुम्हाला आधीच दोन टूल्स मिळतात जर तुमच्या जवळ अँटीव्हायरस नसेल तर तुम्ही हे वापरू शकता. पण एक लक्षात ठेवा की अँटीव्हायरस पेक्षा चांगले नाहीत तुम्हाला अँटीव्हायरस वापरावं लागेलच तुमच्या लॅपटॉपच्या सुरक्षेसाठी.

मायक्रोसॉफ्ट डिफेंडर: हे एक मूलभूत सॉफ्टवेअर आहे. जे की तुम्हाला थोडी फार सुरक्षा देते. याचा एक फायदा अजून एक आहे की तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट एज हे ब्राऊजर वापरत असाल तर स्मार्ट स्क्रीन नावाचं एक फीचर मिळतं जे तुम्हाला धोकादायक वेबसाइट पासून दूर ठेवतं. तुम्ही ब्राऊजरच्या सेटिंग मध्ये जाऊन हे स्मार्ट स्क्रीन सर्च करा आणि हे फीचर चालू करा.

Malicious Software Removal Tool (MRT): हे मायक्रोसॉफ्ट कडून दिले जाणारे एक टूल आहे जे तुमच्या संगणकातील मॅलीशीयस सॉफ्टवेअर हुडकतो आणि त्यांना काढून टाकतो. पण बाकी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर एवढं चांगलं नाही तुम्हाला जर पूर्णपणे सायबर सुरक्षित राहायचं असेल तर अँटीव्हायरस वापरावं लागेलच. हे वापरण्यासाठी तुम्ही स्टार्ट मेनू मधील सर्च मध्ये mrt हे सर्च करून त्याला चालू करा तुम्हाला तीन पर्याय दिसतील त्यातील तुमच्या सोयीनुसार कोणतेही निवडून तुम्ही स्कॅन करून घ्या.

अँटीव्हायरस

तुम्हाला जर पूर्णपणे संगणक सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही अँटीव्हायरस वापरलंच पाहिजे. याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जर तुम्ही जास्त इंटरनेटचा वापर करत असाल तर हे वापराच.

पासवर्ड मॅनेजर

स्ट्रॉंग पासवर्ड असणे खूप गरजेच आहे खूप लोकांचे सोशल मीडिया अकाऊंट हे फक्त सोपे पासवर्ड असल्यानेच हॅक होत असतात. त्यामुळे स्ट्रॉंग पासवर्ड असणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड तयार करू शकत नसाल किंवा लक्षात राहत नसतील तर पासवर्ड मॅनेजर वापरलाच पाहिजे.

व्हीपीएन

लॅपटॉपसाठी एकच चांगलं व्हीपीएन आहे ते म्हणजे प्रोटॉन पण यात तुम्हाला फक्त तीनच सर्वर मोफत वापरण्यासाठी मिळतात. पण अनलिमिटेड याचा वापर करू शकता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जॉइन आणि फॉलो करा

Latest post