फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
मुद्दे
Cloudflare पब्लिक डिएनएस
सायबर सुरक्षा जगातली ही मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. जर तुम्हाला थोडीशी पण माहिती असेल तर तुम्ही या कंपनीचं नाव नक्की ऐकलं असेल. शिवाय खूप वेबसाइट या कंपनीच्या सुविधा वापरतात.
Cloudflare ने त्यांच्या पब्लिक डिएनएस सर्वरमध्ये मूलभूत गोष्टीवर भर दिला आहे. यात कंपनीने स्पीड दिली आहे शिवाय इतर कंपन्यांनी पण याची चाचणी केली आहे. DNSPerf वेबसाइट च्या मते cloudflare ची DNS सेवा सगळ्यात जास्त फास्ट आहे. यात प्रायवसी पण महत्वाची आहे. आणि याची cloudflare ने दक्षता घेतली आहे. ही कंपनी आपली ब्राऊजर हिस्टरी सेव्ह करत नाही आणि याचा वापर जाहिरातींसाठी पण करत नाही. सर्व हिस्टरी ही दर २४ तासांनी नष्ट केली जाते. याची पुष्टी इतर कंपन्यांनी पण केली आहे. ही चाचणी दरवर्षी केली जाते.
याचा वापर तुम्ही विंडोज, मॅक ओएस, लिनक्स, अँन्ड्रॉईड आणि आयओएस यांच्यावर करू शकता. यात दोन प्रकारचे dns सर्वर मिळतात. एकाने तुम्ही मॅलिशियस वेबसाइट ब्लॉक करू शकता आणि दुसऱ्याने तुम्ही adult+मॅलिशियस वेबसाइट ब्लॉक करू शकता. आणि जर यांच्या सर्वरबद्दल तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही त्यांच्या सपोर्ट कम्यूनिटीला बोलू शकता.
गूगल पब्लिक डिएनएस
हे dns सर्वर गूगलकडूनच मिळतं. पण हे गूगलंच आहे, आपल्याला काही देत असेल तर आपल्याकडून काही तरी घेतल्याशिवाय राहणार नाहीच. याला cloudflare एवढी प्रायवसी नाही. पण सुरक्षा त्याच्याएवढीच आहे.
गूगल जवळपास २४ ते ४८ तासांसाठी आपला संपूर्ण आयपी अॅड्रेस आणि queries साठवतो. समस्या निवारण आणि निदान करण्यासाठी, ही गोष्ट तो करतो असं कंपनीने कारण दिलंय पण शेवटी ते याचा उपयोग आपल्याला जाहिराती दाखवण्यासाठी पण करू शकतात. या कालावधीनंतर ते आपली ओळख पटेल अशी सर्व माहिती डिलीट करतात आणि आपली लोकेशन फक्त शहराचीच ठेवतात म्हणजे कदाचित त्यांच्याकडे आपल्या घरचा पत्ता पण जात असेल. नंतर यातील काही माहिती ही random डिलीट केली जाते तेही २ आठवड्यांनी.
यात गूगल दोन सर्वर देतो मुख्य 8.8.8.8 आणि दूसरा 8.8.8.4.
Gcore पब्लिक डिएनएस
२०१४ ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीनुसार ते आपले dns queries सेव्ह तर करतात पण आपली ओळख सेव्ह करत नाहीत. त्यामुळे ही प्रायवसी ठीक आहे म्हणेन. ते ही सर्व माहिती Luxemberg Tier IV डेटा सेंटर मध्ये सेव्ह करतात. हा डेटा सेंटर युरोपीय संघटनेच्या कायद्याअंतर्गत येतात. आणि युरोपीय संघटनेचे प्रायवसी संदर्भातले कायदे खूप चांगले आहेत. हे कायदे कंपनीकडे नाही तर वापरकर्त्यांकडे जास्त झुकलेले आहेत. आणि कंपनीने असंही म्हंटलं आहे की ते ही माहिती कुणालाही विकत नाहीत. 92.85.95.85 आणि 2.56.220.2 हे त्यांचे फ्री पब्लिक dns सर्वर आहेत.
Quad9 पब्लिक डिएनएस
ही कंपनी आयबीएम कंपनीची मालकी असलेली आहे. आयबीएम चं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. ही कंपनी स्वित्झर्लंड स्थित आहे. त्यामुळे याची प्रायवसी ही सर्वोत्तम असणार आहे. आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार ते अशी कुठलीही माहिती साठवत नाहीत ज्यात आयपी अॅड्रेस वापरला असेल. शिवाय जर डिवाइस सपोर्ट करत असेल तर माहिती एंक्रीप्ट पण केली जाते.
ही कंपनी जास्तीत जास्त सायबर सेक्युरिटी कंपन्यांकडून सतत माहिती मिळवते आणि मॅलिशियस वेबसाइट पासून त्यांच्या यूजरला वाचवते. जर तुम्ही किंवा तुमचा डिवाइस अशा वेबसाइटला कनेक्ट करणार असाल तर ते आधीच ब्लॉक करतं.
कंपनीने वेगवेगळे पब्लिक सर्वर दिले आहेत पण तुम्ही त्यांचा मुख्य सर्वर वापरू शकता. 9.9.9.9 आणि 149.112.112.112 आणि doh साठी https://dns.quad9.net/dns-query अँन्ड्रॉईड मोबाईल साठी तुम्ही त्यांच्या app चा वापर करू शकता.
Open DNS पब्लिक डिएनएस
सध्या या कंपनीची मालकी सिस्को या सायबर सेक्युरिटी कंपनीकडे आहे. 2006 सालापासून ही कंपनी कार्यरत आहे. ही कंपनी दिवसाला 620 अब्ज queries हाताळते. ही कंपनी फिशिंग वेबसाइट पण ब्लॉक करते. आणि एक सर्वर फॅमिली फिल्टर सोबत पण येतो. ज्यात ते adult वेबसाइट पण ब्लॉक करतात.
ही कंपनी एकूण चार प्लान पुरवते त्यापैकी दोन हे अगदी मोफत आहेत. यातील होम प्लॅन मध्ये तुम्ही स्वतःच्या मनानुसार वेबसाइट ब्लॉक करू शकता. यासाठी मात्र तुम्हाला एक अकाऊंट तयार करावं लागेल.
Clean Browsing पब्लिक डिएनएस
ही कंपनी मोफतमध्ये तीन वेगवेगळे फिल्टर पुरवते. फॅमिली फिल्टर, adult फिल्टर आणि सेक्युरिटी फिल्टर असे यांचे तीन सर्वर मोफत मध्ये उपलब्ध आहेत.
फॅमिली फिल्टर – यात सर्वप्रकारचे अश्लील वेबसाइट ब्लॉक केले जातात. यात जे डोमेन प्रॉक्सि आणि व्हीपीएन वापरतात फिल्टर बायपास करण्यासाठी त्यांना पण ब्लॉक करतं. शिवाय reddit सारख्या वेबसाइट पण यात ब्लॉक केल्या जातात. ज्या अश्लील कंटेंट पण काही प्रमाणात दाखवतात. मॅलिशियस आणि फिशिंग डोमेन पण यात ब्लॉक केले आहेत.
Adult फिल्टर – यात सर्व प्रकारचे adult. pornographic वेबसाइट ब्लॉक केल्या जातात. पण हे reddit सारखे वेबसाइट ब्लॉक करत नाही. पण मॅलिशियस आणि फिशिंग वेबसाइट नक्की ब्लॉक करतं.
सेक्युरिटी फिल्टर – यात त्यांचा डेटाबेस दर तासाला अपडेट होत असतो. यात सर्व प्रकारचे फिशिंग, स्पॅम आणि मॅलिशियस वेबसाइट ब्लॉक करतं. पण हे adult वेबसाइट ब्लॉक करत नाही.
Comodo dns पब्लिक डिएनएस
ही खूप जुनी आणि नावाजलेली कंपनी आहे. ही दोन प्रकारचे सर्वर पुरवते. एक सिक्युर पब्लिक सर्वर आणि दुसरं comodo secure इंटरनेट gateway सर्वर यांचे सर्वर फिशिंग वेबसाइट, malicious वेबसाइट पण ब्लॉक करतं.
8.20.56.26/2.20.247.2. आणि 8.26.56.10/ 8.20.247.10 हे त्यांचे सर्वर आहेत.
Controld पब्लिक डिएनएस
ही कंपनी windscribe या व्हीपीएन कंपनीद्वारे बनवली गेली आहे. २०२१ मध्ये याची स्थापना झाली होती. कॅनडा मध्ये ही कंपनी स्थित आहे. यांची dns सेवा मी स्वतः वापरत आहे. आणि यांचे सर्वर चांगल्याप्रमाणे काम करतात. शिवाय हे सर्वर जाहिराती आणि ट्रॅकर पण ब्लॉक करतात.
इतर कंपन्यांपेक्षा यात जास्त पर्याय मिळतात. Unfiltered, malware, ads & tracking, social, family friendly, Uncensored, adult content, dating, drugs, gambling, govt sites, social असे खूप पर्याय आहेत.
Vercara पब्लिक डिएनएस
ही कंपनी गेली २५ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. यात कंपनी तीन वेगवेगळे फिल्टर देते. पहिलं आहे unfiltered resolution यात कसल्याही प्रकारचं blocking होत नाही. दुसरं आहे threat protection यात malware, ransomware, spyware, आणि फिशिंग असे malware पसरवणाऱ्या वेबसाइटपासून सुरक्षा देते. तिसरं आहे फॅमिली सिक्युर यात threat protection चे सर्व फीचर तर मिळतातच सोबत gambling, pornographic, violence आणि hate/discrimination असे फिल्टर आहेत. हे लहान मुलांसाठी चांगलं आहे.
सेफ dns पब्लिक डिएनएस
२०१० मध्ये अमेरिकेत या कंपनीची सुरुवात झाली. 195.46.39.39 आणि 195.46.39.40 हे त्यांचे सर्वर आहेत.
KeepSolid dns
62.210.136.158 आणि 69.162.67.202
dns Filter
103 247.36.36 आणि 103.247.37.37
Next Dns पब्लिक डिएनएस
याची सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला यांच्या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला अकाऊंट तयार करावं लागेल. ही कंपनी महिन्याला तीन लाख request फ्री मध्ये देते. या डिएनएस च्या मदतीने ट्रॅकर आणि जाहिराती ब्लॉक करू शकता. आणि ही कंपनी सुरक्षित पण आहे. तुमच्या कसल्याही माहितीचा वापर ते जाहिरातीसाठी करणार नाहीत किंवा तुमची माहिती विकणार नाहीत. शिवाय तुम्हाला dashboard पण मिळतो म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमचा मोबाईल कोणत्या सर्वरला कनेक्ट होत आहे आणि वाटलं तर तुम्ही ते ब्लॉक पण करू शकता. खास करून जर तुम्ही चीनी कंपणीचे मोबाईल वापरत असाल तर याचा वापर करू शकता.
Leave a Reply