फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
इंटरनेट आणि ब्राऊजर वापरत असाल तर हे सर्वोत्तम मोबाईल अँटीव्हायरस (Mobile Antivirus) तुमच्या मोबाईल मध्ये असलेच पाहिजेत. या लेखात जाणून घेऊयात सर्वोत्तम मोबाईल अँटीव्हायरस (Mobile Antivirus) जे की मोफत आणि पेड पण असतील. सध्या भारतात जवळपास ७४ कोटी पेक्षा जास्त लोकं स्मार्टफोन वापरणारे आहेत शिवाय भारतात इंटरनेट पण इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. त्यामुळे वापरकर्ते इंटरनेट चा पण वापर खूप करतात. काही लोकांची कामे तर ऑनलाइनच असतात. त्यामुळे त्यांनी मोबाईल अँटीव्हायरस वापरणे गरजेचे आहे.
मुद्दे
मोबाईलसाठी अँटीव्हायरस (Mobile Antivirus) का वापरावा?
मोबाईल हॅकिंग
सध्या भारतात ७४ कोटी स्मार्टफोन चे वापरकर्ते आहेत आणि हा आकडा २०२६ पर्यंत १०० कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल चा वापर वेगवेगळ्या कामासाठी वापरत असता जसे: ऑनलाइन खरेदी, पैसे पाठवणे, ऑनलाइन बील भरणे, माहिती गोळा करणे इ. असे खूप कामे आहेत जे तुम्ही करत असाल. पण अशावेळी तुमचा मोबाईल हा असुरक्षित असतो कारण नुसत्या एखाद्या लिंक वर जरी तुम्ही क्लिक केलात तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो आणि हॅकर कडे तुमची सर्व माहीती जाऊ शकते. तुमच्या नकळत या गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. इंटरनेट आणि स्मार्टफोन च्या वापराने भारतात खूप असे सायबर गुन्हे होत आहेत. एक अँटीव्हायरस तुम्हाला या पासून दूर ठेऊ शकतो.
अँटीव्हायरस (Antivirus) करतो तरी काय?
तुम्ही जर रोज ब्राऊजर वापरत असाल तर तुम्ही नक्कीच मोबाईलसाठी अँटीव्हायरस वापरलं पाहिजे. कारण तुम्ही आंधळेपणाने गूगल वर विश्वास ठेऊन लिंक वर क्लिक करत असता. पण गूगल वर येणाऱ्या सर्व लिंक्स या सुरक्षित असतात असं नाही.
कारण हॅकर्स त्यांचे पोस्ट अशा प्रकारे लिहितात की जेणेकरून ते गूगलच्या पहिल्या पानावर येतील आणि तुम्ही त्यावर क्लिक करताल. हे अँटीव्हायरस तुम्हाला सांगतील की कोणती लिंक ही धोकादायक आहे की नाही आणि तुम्ही त्यावर गेले पाहिजे की नाही. शिवाय हे अँटीव्हायरस जर तुम्ही घातक ॲप्स वापरत असाल तर त्याबद्दल ही हे तुम्हाला सांगतील. मॅलवेर, रॅन्समवेअर, धोकादायक ॲप्स(मॉड एपीके) अशा धोक्यांबद्दल तुम्हाला सांगतं.
खाली तुम्हाला काही ॲप्स बद्दल सांगेन तुम्ही तुमच्या वापरानुसार कोणतेही डाउनलोड करू शकता.
- बेस्ट फ्री पासवर्ड मॅनेजर
- DNS म्हणजे काय?
- पेगासस स्पायवेअर स्कॅम 2024
- मोबाईल सुरक्षा टिप्स मराठी
- पासवर्ड मॅनेजर म्हणजे काय?
best free antivirus
सोफोस Intercept X
ही कंपनी जे फीचर्स देते त्यासाठी इतर कंपन्यांना पैसे द्यावे लागतील. आणि याचे सर्व फीचर्स चांगल्या प्रकारे काम पण करतात. मी स्वत: याला माझ्या मोबाईल वर पण टेस्ट केलं आहे. त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्कीच करा.
फीचर्स | अँड्रॉईड | आयओएस |
---|---|---|
डिवाइस सुरक्षा | आहे | आहे |
मॅन इन द मिडल अटॅक पासून सुरक्षा | आहे | आहे |
वेब प्रोटेक्षण | आहे | आहे |
वेब फिल्टरिंग | आहे | आहे |
फिशिंगपासून सुरक्षा | आहे | |
मॅलवेअरपासून सुरक्षा | आहे | नाही |
घातक apps पासून सुरक्षा | आहे | नाही |
सुरक्षित QR कोड स्कॅनर | आहे | आहे |
ऑथेंटिकेटर | आहे | आहे |
पासवर्ड मॅनेजर | आहे | आहे |
प्रायवसी सल्लागार | आहे | नाही |
सुरक्षा सल्लागार | आहे | नाही |
वेब प्रोटेक्षण मध्ये तुम्ही जेव्हा ब्राऊजर मध्ये कोणत्याही लिंक वर क्लिक कराल तेव्हा ती लिंक सुरक्षित आहे की नाही ही आधी तपासेल सुरक्षित असल्यावरच तुम्हाला तो पुढे जाऊ देईल नाही तर एक चेतावणी देईल मग तुम्ही ठरवू शकता की पुढे जायचं आहे की नाही. आणि ही फीचर क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊजर वर त्यांनी स्वतः तपासलं आहे आणि इतर ब्राऊजर वर पण काम करेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी तपासल्याप्रमाणे इतर ब्राऊजर वर पण चांगल्या प्रमाणे ही काम करतं.
वेब फिल्टरिंग मध्ये यांनी १४ वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाइट गट तयार केले आहेत ज्यानुसार तुम्ही हवं ते ब्लॉक करू शकता. म्हणजे जर तुम्हाला याच्या मदतीने अश्लील वेबसाइट पण ब्लॉक करू शकता.
ही कंपनी धोकादायक apps पासून पण तुमचा मोबाईल वाचवते. यासाठी ते ai चा आणि त्यांच्याकडे असलेल्या माहितीचा वापर करतात.
एम कवच २
हे अँटीव्हायरस भारतात बनवले गेले आहे. हैद्राबादच्या कंपनीने याला बनवले आहे. हे अगदी मोफत असे अँटीव्हायरस आहे. पण इतर अँटीव्हायरस एवढं ही चांगलं नाही. यात वेब प्रोटेक्षण ची सुरक्षा मिळत नाही.
यात Threat Analyzer ही फीचर मिळतं ज्यात ही मोबाईल मध्ये मॅलवेअर आहे की नाही ही बघतं. Security Advisor मध्ये मोबाईल मध्ये कोणती सेटिंग चालू असली पाहिजे किंवा नसली पाहिजे याबद्दल ही सांगतं. जर तुम्ही स्वतः एखादी सेटिंग चालू केली असेल आणि हे app जर त्याला बंद करायला सांगत असेल तर करा. आणि जर तुम्हाला त्या सेटिंग बद्दल माहिती असेल तर तुम्ही ती चालू पण ठेऊ शकता.
Hidden/Banned Apps काही मॅलवेअर असे असतात जे आपल्याला स्क्रीन वर दिसत नाहीत. त्यांना बघण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि जर तुम्ही त्या app ला ओळखत नसाल तर ती डिलीट करू शकता. Adware Scanner च्या मदतीने तुमच्या मोबाईल मधील कोणत्या app जाहिराती दाखवतात याबद्दल सांगतं. पण जर तुम्ही चीनी कंपनीचा फोन वापरत असाल तर मग त्यात आधीच खूप जास्त जाहिराती येतात त्यांना थांबवू शकत नाहीत.
क्विकहिल अँटीव्हायरस
ही नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. ही कंपनी पण चांगली आहे. यात फ्री मध्ये तुम्हाला वेब प्रोटेक्षण फीचर मिळतं ज्यासाठी इतर कंपन्यांना पैसे द्यावे लगतात. त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. शिवाय यात Quick Scan, Deep Scan, App Lock, Anti theft, Safe Browsing, WIFI security, Battery saver, Device cleaner, Privacy Advisor, App Advisor, Screen Time हे सर्व फीचर मिळतात. यापेक्षा पण जास्त अजून खूप फीचर आहेत त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आणि वर नमूद केलेले फीचर वापरायचे असतील तर मग app मध्ये जाहिराती दाखवले जातील. आणि हे जाहिरात गूगल ads च्या मदतीने दाखवले जातात जी की चांगली गोष्ट नाही. गूगल या app च्या मदतीने ट्रॅक करू शकतं.
अविरा सेक्युरिटी
ही कंपनी क्विकहिल पेक्षा थोडे काही फीचर कमी देते पण एक फीचर जास्त देते जी क्विकहिल मध्ये नाही. यात स्मार्ट स्कॅन मिळतं जे adware, riskware आणि धोकादायक apps ब्लॉक करतं. शिवाय फोनचं स्टोरेज पण स्कॅन करतं. जे की वरील अँटीव्हायरस मध्ये पण मिळतं. यात app लॉक पण मिळतं. Identity Safeguard मध्ये तुम्ही ईमेल स्कॅन करून तो डार्क वेब वर आहे की नाही याबद्दल माहिती मिळवू शकता. ही फीचर वरील अँटीव्हायरस मध्ये नाही. यात डिवाइस बुस्टर पण मिळतो. कॉल ब्लॉकर, पर्मिशन मॅनेजर हा पण पर्याय मिळतो. शिवाय ही कंपनी पण खूप चांगली आहे याचा वापर करू शकता.
यात व्हीपीएन पण मिळतं पण फक्त १०० mb पर्यंतच याचा वापर करू शकता.
Kaspersky
ही रशियाची कंपनी आहे. यावर विश्वास ठेवायचा की नाही ही तुमची मर्जी आहे. याची सुविधा पण खूप चांगली आहे. यात २०० mb पर्यंत व्हीपीएन वापरायला मिळतं. धोकादायक apps पासून वाचवतं. स्कॅन साठी वेगवेगळे पर्याय मिळतात. ज्याप्रमाणे लॅपटॉप मध्ये पर्याय मिळतात तसेच यात आहेत. तुम्ही पूर्ण मोबाईल स्कॅन करू शकता, क्विक स्कॅन पण करू शकता किंवा फक्त एक फाइल पण स्कॅन करू शकता. कॉल फिल्टर पण मिळतं. QR कोड स्कॅनर मिळतं. सुरक्षित पणे स्कॅन करू शकता. वीक सेटिंग चालू आहेत की नाहीत ही पण बघू शकता. कोणती पर्मिशन कोणत्या app ला दिली आहे ते बघू शकता. इतर फीचर्स साठी पैसे द्यावे लागतील.
ESET
ही पण एक चांगली कंपनी आहे पण फ्री मध्ये ही फक्त अँटीव्हायरस स्कॅनिंग हे एकच फीचर देते याच्या बाकीचे फीचर्स हे विकत घ्यावे लागतील.
Bitdefender
याच्या फ्री प्लान मध्ये फक्त अॅंटीवायरस स्कॅन हेच फीचर मिळतं. पण यासाठी ही app इंटरनेट चा वापर करते. आणि मोबाईल वर जास्त लोड पण ताकत नाही. त्यामुळे जर मोबाईल जास्त पावरफुल नसेल तर याचा वापर करू शकता.
Mcafee
ही कंपनी फ्री मध्ये फक्त तीनच फीचर देते ज्यात antivirus स्कॅन, वायफाय स्कॅन आणि आयडेनटिटी स्कॅन हे आहेत. यापेक्षा जास्त काही पाहिजे असेल तर मग खरेदी करावं लागेल.
चीनी मोबाईल कंपन्या
तसं कोणतीही मोबाईल कंपनी त्यांच्या मोबाईल मध्ये जर त्यांचं एखादं अॅंटीवायरस सारखं app देत असेल तर ते तुम्हाला फार काही सुरक्षित ठेऊ शकत नाही. कारण त्या पण avast सारख्या कंपनीचे फीचर्स वापरुन त्यांच्या नावाने खपवतात. आणि avast चे अॅंटीवायरस वापरू नका. कारण ही कंपनी त्यांच्या यूजर ची माहिती दुसऱ्या कंपन्यांना विकत होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये ही घटना घडली आहे. याबाबत कंपनीला दंड पण ठोठावण्यात आला होता.
आणि चीनी कंपन्या इतर अँटीव्हायरस apps ला accessibility ची पर्मिशन बरोबर देतच नाहीत. काही दिवसांनी त्या ऑटोमॅटिक ती पर्मिशन काढून टाकतात. माझ्या घरात redmi, iqoo आणि विवो चे फोन आहेत त्या मध्ये मला ही अडचण दिसली आहे. ही पर्मिशन तुम्हाला ब्राऊजिंग करताना सुरक्षित ठेवते. पण सॅमसंगच्या मोबाईल मध्ये अशी कसल्याही प्रकारची अडचण दिसून आली नाही.
अँटीव्हायरस (Antivirus) करतो तरी काय?
अँटीव्हायरस तुम्हाला घातक ॲप्स वापरत असाल तर त्याबद्दल ही हे तुम्हाला सांगतील. मॅलवेर, रॅन्समवेअर, धोकादायक, ॲप्स(मॉड एपीके) अशा धोक्यांबद्दल तुम्हाला सांगते.
मोबाईलसाठी अँटीव्हायरस (Mobile Antivirus) का वापरावा?
इंटरनेट आणि स्मार्टफोन च्या वापराने भारतात खूप असे सायबर गुन्हे होत आहेत. एक अँटीव्हायरस तुम्हाला या पासून दूर ठेऊ शकतो.
Leave a Reply