फ्री डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स | Dark Web Monitoring Tools

·

·

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

सध्या इंटरनेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. कदाचित खूप जणांचा दिवस तर सोशल मीडिया पाहिल्याशिवाय तर सुरूच होत नाही. अन् आपण जे काही इंटरनेट वापरतो ते फक्त ४ ते ५ टक्केच आहे. त्याला सर्फेस वेब (surface web) असे म्हणतात. जे आपल्यासारखे साधारण लोकं वापरतात.

फ्री डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स

डार्क वेब

इंटरनेटचा ४ ते ५ टक्के भाग हा साधारण लोकं वापरतात. तर बाकीचा जो ९४ टक्के भाग आहे त्याचा थोडा वापर जवळपास आपण सर्व जण करतो पण त्याबद्दल आपल्याला जाणीव नसते त्याला डीप वेब असं म्हणतात. उरलेल्या जवळपास १ टक्के भागाचा वापर लोकं लोकांना फसवण्यासाठी करतात. किंवा सर्व काही काळे धंदे इथेच होतात. तसं हे वापरण बेकायदेशीर नाही पण याचा वापर लोकांना फसवण्यासाठी करणे हे बेकायदेशीर आहे. डार्क वेब (Dark Web) चा वापर जास्तीत जास्त हॅकर्स करतात.

या डार्क वेब (Dark Web) चा वापर अनधिकृतरित्या बंदुकी विकत घेणे, लोकांची माहिती विकणे, ड्रग्स विकणे, लोकांची मिळालेली माहिती वापरुन त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे अशा वेगवेगळ्या कामासाठी याचा वापर होतो. अंडरवर्ल्ड याचा वापर करत असतो. पण याचा वापर फक्त वाईट कामांसाठी होत असतो असं पण नाही. काही शोध पत्रकार (investigating journalist) हे पण याचा वापर कर असतात. याचा वापर करून ते सरकारी-कॉर्पोरेट घोटाळे उघडकीस आणत असतात. आणि माझ्यासारखे cyber security researcher पण करतात.

डार्क वेब का वापरतात?

डार्क वेब (Dark Web) वर अनियन राऊटिंग हे तंत्रज्ञान वापरतात. यामुळे वापरकर्त्यांना त्यांची गोपनीयता राखण्यासाठी मदत होते. याने त्यांना ट्रॅक कारण अशक्य होऊन जातं. त्यामुळेच हॅकर्स याला पसंती दर्शवतात.

डार्क वेब वर माहिती कशी जाते?

तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल की अमुक अमुक कंपनीचा डेटा हॅक झाला. अशा हल्ल्यातूनच याच्यावर आपली माहिती जाते. हॅकर कंपनीच्या सुरक्षे मधील कमतरता ओळखून त्यांच्या डेटाबेस मधून माहिती चोरतात. मग ते कंपनीला पैशांची मागणी करतात. याची फार कमी शक्यता असते की पैसे जरी दिले तरी माहिती डार्क वेब (Dark Web) वर टाकणार नाहीत.

आपल्या माहितीचा वापर कसा केला जातो?

कदाचित त्यांना या वेब वरच जास्त पैसे मिळत असतील. ते दोन्हीकडून पैसे घेत असतील. मग काही स्कॅमर्स ही माहिती विकत घेऊन मग आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. या डेटा लीक मध्ये आपला फोन क्रमांक, पत्ता, नाव, क्रेडिट कार्ड ची माहिती, सोशल मीडिया अकाऊंटची माहिती, पासवर्ड ही सर्व माहिती डार्क वेब (Dark Web) वर उघड होते.

कधी कधी आपल्या पॅन कार्ड किंवा आधार कार्डची माहिती पण लीक होते. यांचा वापर करून ते आपल्या नावावर कर्ज घेत असतात, किंवा आपल्या आधार कार्डचा वापर करून नवीन सिम कार्ड पण घेऊ शकतात. जून २०२३ मध्ये अशी बातमी होती की कोविन पोर्टल वरील माहिती लीक झाली म्हणून यात खूप लोकांचा डेटा एका टेलेग्राम बॉट वर होता.

डार्क वेब मॉनिटरिंग म्हणजे काय?

बाजारात खूप अशा कंपन्या आहेत ज्या की तुमच्यासाठी तुमच्या महितीवर लक्ष ठेवत असतात. पण त्या नक्की पैसे घेतील. पण काही मोफत अशा वेबसाइट आहे ज्या या सुविधा पुरवतात. पण यासाठी तुम्हाला स्वतः जाऊन तिथे वेळोवेळी तपासून पहाव लागेल. तुम्हाला दोन्ही पर्याय मी सांगणार आहे.

पण जर तुमची माहिती जर डार्क वेब (Dark Web) वर सापडली तर काय करावं? कोणती माहिती सापडली आहे ते याच्यावर अवलंबून आहे. जर तुमचे पासवर्ड सापडले असतील तर तात्काळ सर्व पासवर्ड बदलले पाहिजेत. अन् जर तुमचा जीमेल आयडी सापडला असेल तर त्याचा पासवर्ड पण बदलला पाहिजे. जिथे जिथे त्या जीमेल चा वापर करून अकाऊंट उघडले असतील त्यांचे पण पासवर्ड बदलले पाहिजेत. तुम्हाला जर पासवर्ड लक्षात राहत नसतील तर तुम्ही पासवर्ड मॅनेजर वापरू शकता. काही मोफत पासवर्ड मॅनेजर आहेत ते तुम्ही इथे क्लिक करून त्यांच्या बद्दल वाचू शकता.

जर तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती सापडली असेल तर तुम्ही त्याचा पिन आधी बदलला पाहिजे. तुमची जर एक सवय असेल की कोणत्याही वेबसाइट वर तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर सेव्ह करत असाल तर ती बदला. नशीब कधी खराब होईल काही संगता येणार नाही. वेबसाइट कधीही हॅक होऊ शकतात. पण जर पॅन आणि आधार कार्ड सापडलं असेल तर मात्र काही करता येणार नाही. कारण ते आपण बदलू शकणार नाहीत. त्यामुळे पुढे कधीही त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगा.

काही अशा मोफत वेबसाइट आहेत ज्या सांगतात की तुमची माहीती डार्क वेब वर आहे की नाही.

खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती पडताळू शकता अगदी मोफत.

फ्री डार्क वेब लीक चेकर

cyble logo

Cyble फ्री डार्क वेब मॉनिटरिंग टूल

या टूलच्या मदतीने नाव, ईमेल, तुमचा आयपी अॅड्रेस, फोन नंबर, यूजरनेम, क्रेडिट कार्ड नंबर या गोष्टी पण तपासू शकता.

Logo Credits: To all the respective brands

विकत

अशा खूप नामांकित कंपन्या आहेत ज्या ही सुविधा पुरवतात पण ते शुल्क आकारतात. जसे की McAfee याची ही सुविधा पाहिजे असल्यास तुम्हाला त्यांचा अँटीवायरस विकत घ्यावा लागेल. अजून एक कंपनी आहे BitDefender नावाची यासाठी त्यांचं वेगळं प्रॉडक्ट आहे Digital Identity Protection नावाचं. शिवाय त्यांच्या प्रीमियम अँटीवायरस प्लॅन विकत घेतला तर त्यामध्ये ते ईमेलसाठी स्कॅन करत असतात.

गूगल वन वापरत असाल तर मग गूगल त्या ईमेल शी निगडीत जर काही लीक झालं असेल तर मग तुम्हाला स्वतः सांगेल आणि जर गूगल वन विकत घेतलेलं नसेल तर मग तुम्ही गूगल वन वेबसाइट वर जाऊन स्वतः ते स्कॅन करू शकता. इतर अॅंटीवायरस कंपन्या पण आहेत ज्या अशा सुविधा पुरवतात.

विकत घेण्याचा एक चांगला फायदा आहे तो म्हणजे जेव्हा पण तुमचा ईमेल डार्क वेब वर सापडेल तेव्हा ती कंपनी तुम्हाला लगेच सांगेल नाही तर मग तुम्हालाच दर वेळी जाऊन चेक करावं लागेल की माहिती डार्क वेब वर आहे की नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जॉइन आणि फॉलो करा

Latest post