फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
मुद्दे
Privacy, Search and Services
ट्रॅकिंग prevention चालू करा त्यातही स्ट्रीक्ट पर्याय निवडा

क्लियर browsing data ऑन close

यात तुम्ही तुमच्या मर्जीनुसार हवं ते पर्याय निवडू शकता. जर काहीच माहीत नसेल तर सोडून द्या याला छेडू नका.
प्रायवसी

यातील send do not track हा पर्याय चालू करा
Search and service/personalization and advertising
हे दोन्ही पर्याय बंद करा याचा वापर ते तुम्हाला ट्रॅक आणि ads दाखवण्यासाठी करतात.

Security
microsoft defender स्मार्ट स्क्रीन चालू करा. याच्या मदतीने defender तुम्हाला malicious आणि फिशिंग वेबसाइट पासून वाचवतं.

block potentially unwanted apps हा पर्याय चालू ठेवा हे महत्वाचं फीचर आहे

website typo protection जर स्पेलिंग चुकली तर दुसऱ्या वेबसाइटवर जाण्यापासून तुम्हाला वाचवेल.

use secure dns

जर तुम्ही कोणतंही dns वापरत नसाल तर choose सर्विस प्रोवायडर मधून cloudflare चं वापरू शकता. आणि जर वापरत असाल तर तसंच राहू द्या.
Enhance Security ला स्ट्रीक्ट वरच राहू द्या.

सर्विसेस मधील पर्याय तुम्ही तुमच्या मर्जीनुसार चालू किंवा बंद करू शकता.
कूकीस आणि साइट पर्मिशन
यात लोकेशनला ask first किंवा ब्लॉक वर राहू द्या

motion sensors, pop ups अँड redirects, intrusive ads यांना ब्लॉक वर सेट करा
Downloads

show download menu when a download starts हा पर्याय चालू ठेवा याला अजिबात बंद करू नका कारण जर एखादी फिशिंग किंवा malicious साइट वर तुम्ही गेलात तर ते तुमच्या नकळत मॅलवेअर डाउनलोड करू शकतात आणि हा पर्याय चालू असल्याने ब्राऊजर तुम्हाला आधी विचारेल की कुठे सेव्ह करायची आहे किंवा डाउनलोड करायचं आहे की नाही.
System and Performance

जर हा ब्राऊजर वापरत नसाल तर पहिले दोन्ही पर्याय बंदच ठेवा. किंवा जर लॅपटॉप ची बॅटरी वाचवायची असेल तरी ही दोन्ही पर्याय बंद ठेवाच.
Leave a Reply