फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
या टूलच्या मदतीने तुम्ही तुमच्या पासवर्ड ची अग्निपरीक्षा घेऊ शकता.
Password Entropy काम कसं करतं?
यात तुमच्या पासवर्डची entropy तपासली जाते. E = log2 (R^L) हे याचं सूत्र आहे.
यात E म्हणजे पासवर्ड entropy याला bits या एककात मोजतात.
Log2 हे एक गणितातील सूत्र आहे जो आपल्याला पासवर्डची entropy देतो.
यात R हा तुमच्या पासवर्ड नुसार ठरतो म्हणजे जर तुम्ही तुमच्या पासवर्ड मध्ये जर फक्त इंग्रजी अक्षरांचाच वापर केला असेल तर मग याची किंमत ही २६ असेल आणि जर यात मग तुम्ही अंकांचा पण वापर केला असेल तर मग याची किंमत ही २६+१०=३६ एवढी होईल. आणि जर यातच तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल लेटर चा पण वापर केला तर मग याची किंमत ही २६+२६+१०=४६ एवढी होईल. अशाप्रकारे याची किंमत ठरते.
L ची किंमत ही तुमच्या पासवर्डच्या लांबीवरून ठरते. जर तुमचा पासवर्ड १० कॅरक्टरचा असेल तर याची किंमत १० असेल.
या सूत्रानुसार जे उत्तर येईल यावरून तुमचा पासवर्ड किती सुरक्षित आहे हे ठरतं.
०-३५ | लाज वाटली पाहिजे, वापरायचा नाही |
३५-५९ | थोडी कमी लाज वाटली पाहिजे, अजून चांगला पासवर्ड बघा |
६०-११९ | या रेंज मधला वापरा, हॅकरला घाम फुटेल याला क्रॅक करण्यासाठी |
१२०+ | बिनधास्त वापरा, न्यूनगंड बाळगायची पण गरज नाही |
या सूत्राच्या मदतीने जे पण उत्तर येईल तुम्ही या तक्त्यातून तपासा.
यातून तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जे उत्तर येईल त्यानुसार हॅकर फक्त तुमचा पासवर्ड brute फोर्स च्या मदतीने तो क्रॅक करू शकतो किंवा नाही हे त्याच्यासाठी किती सोपं आहे ते सांगतं. पण जर तुमचे पासवर्ड एखाद्या कंपनीच्या ब्रीच मध्ये, किंवा तुमच्या चुकीमुळे, किंवा एखाद्या infostealer च्या तावडीत सापडले तर मग ते हॅकर कडे जाणारच. अशी काही घटना घडली तर माझ्या नावाने बोटं मोडू नका म्हणजे झालं.
स्वतः पण याची काळजी घ्या की तुमचे पासवर्ड कसल्याही प्रकारे हॅकरच्या तावडीत सापडू नयेत.
तुम्ही जर ०-३५ बीट रेंज मधील पासवर्ड वापरत असाल तर हॅकर असे पासवर्ड अगदी सहजरीत्या त्याच्या साध्या कॉम्प्युटरच्या मदतीने पण क्रॅक करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवायचे असतील तर चांगले आणि रॅनडम पासवर्ड तयार करा. यासाठी या वेबसाइट वर पण तुम्हाला टूल मिळून जातील. आणि जास्त सुरक्षेसाठी १२०+ बीट चे पासवर्ड वापरा, हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकरला खूप जास्त पॉवर वाले कॉम्प्युटर लागतील ज्याला खर्च पण जास्त येईल आणि हा खर्च तो तुमच्या वर तर करणार नाही.
चांगले अॅंटीवायरस सॉफ्टवेअर वापरा. शक्य असेल तर अॅंटीवायरस चे प्रीमियम प्लॅन नक्की विकत घ्या.
डार्क वेब सतत तुमची माहिती लीक झाली आहे की नाही हे तपासात रहा.
मोबाईल किंवा कॉम्प्युटर मधील सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करत रहा. शिवाय मोबाईल चे ऑपरेटिंग सिस्टम आहेत त्यांना पण अपडेट करत रहा.
एकच पासवर्ड वापरणं टाळा. जास्त अकाऊंट असतील तर पासवर्ड मॅनेजरचा वापर करा आणि पासवर्ड मध्ये स्वतःची माहिती वापरणं टाळाच.
पासवर्ड मध्ये नाव, गाव, फूल, फळ, वस्तु, माय, बाप, भाऊ, बहीण आणि लफडी यांच्या नावाचा वापर टाळा.
ईमेल, मेसेज, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक्स, फाइलकधीच उघडू नका.
तुमच्या सर्व सोशल मीडियावर टू स्टेप verification चालू ठेवा. कारण खूपदा कंपन्यांच्या चुकीमुळे आपली माहिती डार्क वेब वर झळकते ज्यात आपले पासवर्डस पण असतात.
अशावेळी टू factor किंवा मल्टी factor authentication महत्त्वाचा ठरतो. याने आपलं अकाऊंट हॅक होण्यापासून वाचतं.
सार्वजनिक वायफाय वर vpn चा वापर करा आणि हे फुकटचे vpn वापरणं टाळा ते अजून घातक ठरू शकतात. असे vpn वापरा जे आपली माहिती एनक्रिप्ट करत असतील.