फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
सध्या आपण सर्वच जण ऑनलाइन दुनियेत जगत आहोत. या दुनियेत अशी काही दुकान आहेत जिथे आपल्याला खाती उघडावी लागतात. त्यांना पासवर्ड पण ठेवावी लागतात. प्रत्येकाला वेगळा पासवर्ड ठेवणं खूप गरजेचं आहे.
मुद्दे
तुमचं गूगल, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम, मायक्रोसॉफ्ट आणि डिस्कॉर्ड अशा इतर ठिकाणी अकाऊंट असतील. आणि जर लक्षात राहावं म्हणून तुम्ही जर प्रत्येकाला सोपे पासवर्ड किंवा पासवर्ड मध्ये तुमच्या नावाचा वापर करत असाल किंवा सर्वच अकाऊंटला एकच पासवर्ड वापरत असाल तर ते काहीच कामाचं नाही. तुम्ही कपडे घालून पण नागडेच आहात.
प्रत्येक अकाऊंटला वेगळा पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे. असंही करू नका की गूगलला वापरलेला पासवर्ड काही वेळेनं फेसबूकसाठी वापरताय. त्याचा काडीचा ही फायदा तुम्हाला होणार नाही. कारण एखादा हॅकर तुमच्या बद्दल माहिती पण गोळा करू शकतो आणि त्याद्वारे तुमचे सगळे पासवर्ड पण मिळवेल आणि मग प्रत्येक पासवर्ड तुमचा अकाऊंट हॅक करण्यासाठी वापरेल. त्यामुळे असा पराक्रम करू नका.
तुम्ही जर विद्यार्थी किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत काम करणारे असाल तर मग तुमचे किमान वीस अकाऊंट तर असतीलच आणि एवढ्या अकाऊंटचे पासवर्ड लक्षात ठेवणं खूप अवघड जाईल. म्हणून तुम्ही पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
पासवर्ड मॅनेजर म्हणजे काय?
याच्या नावावरूनच तुमची अर्थ लावू शकता की तुमचे पासवर्ड मॅनेज करतो. एवढंच नाही नाही तर यात तुम्ही तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर सेव्ह करू शकता. महत्त्वाच्या नोंदी पण यात ठेवू शकता. महत्त्वाचा पत्ता पण सेव्ह करता येतो. जो तुम्ही एखादा ऑनलाइन फॉर्म भरताना ऑटोमॅटिक भरू शकता.
शिवाय पासवर्ड मॅनेजर तुमच्यासाठी स्ट्रॉंग आणि unique असे पासवर्ड तयार करून देतात. जेव्हा पण तुम्हाला लॉगिन करायचं असेल तेव्हा तो ऑटोमॅटिक फक्त एका क्लिक वर यूजरनेम आणि पासवर्ड त्या जागेत भरून देतो.
- सोशल इंजीनीयरिंग म्हणजे काय?
- किलॉगर म्हणजे काय?
- फोन हॅक झालाय तर या गोष्टी करा
- व्हीपीएन म्हणजे काय?
- बेस्ट फ्री पासवर्ड मॅनेजर
पासवर्ड मॅनेजरसाठी तुम्हाला फक्त एकाच पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल. त्याला मास्टर पासवर्ड असं म्हणतात. हा पासवर्ड तुमची एंक्रिप्शन की असेल त्यामुळे विसरून चालणार नाही.
पासवर्ड मॅनेजरचे प्रकार
पासवर्ड मॅनेजरचे एकूण तीन प्रकार आहेत
लोकल पासवर्ड मॅनेजर
हा मॅनेजर तुमच्या डिवाइसवरच पासवर्ड सेव्ह करतो. त्यामुळे जर कधी इंटरनेट नसलं तरी याचा वापर तुम्ही करू शकाल. पण तुम्ही याला फक्त एकाच डिवाइस मध्ये वापरू शकता.
जर याची कंपनी हॅक झाली तरी तुमचे पासवर्ड सुरक्षित राहतील. कारण ते तुमच्या डिवाइस मध्येच सेव्ह केलेले असतात. पण याचा एक तोटा आहे तो म्हणजे जर तुमच्या डिवाइस मध्ये एखादा मॅलवेअर घुसला तर मग ते पासवर्ड चोरी होऊ शकतात.
फायदे | तोटे |
---|---|
कंपनी जरी हॅक झाली तरी पासवर्ड सुरक्षित राहतील. | डिवाइस हॅक झाल्यावर पासवर्ड पण हॅक होतील. |
साधारणतः मोफत असतात. | डिवाइस गेला की पासवर्ड पण गेले. |
फक्त एकच डिवाइस वर वापरता येतो. | |
जास्त डिवाइस वर वापरायचं असेल तर स्वतः पासवर्ड प्रत्येक याच्यात अपडेट करावे लागतील. |
ब्राऊजर आधारित पासवर्ड मॅनेजर
तुम्ही कोणतंही ब्राऊजर वापरत असाल तरी त्यात फक्त एक पासवर्ड मॅनेजर तर असतोच. गूगल क्रोम, सफारी, मोझिल्ला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एड्ज इत्यादी. ब्राऊजर मध्ये इनबिल्ट मॅनेजर आहेत.
पण याचा एक मुख्य तोटा म्हणजे समजा तुम्ही मोबाईलमध्ये गूगल क्रोम वापरताय आणि लॅपटॉप मध्ये मायक्रोसॉफ्ट एड्ज मग अशावेळी तुम्हाला दोन्ही ब्राऊजर मध्ये पासवर्ड सेव्ह करावे लागतील. क्रोममधील पासवर्ड तुम्ही एड्ज मध्ये वापरू शकणार नाहीत. ही पासवर्ड मॅनेजर २५६ बीट AES या एंक्रिप्शन पद्धतीचा वापर करतात. जेणेकरून ते स्वतः पण तुमचे पासवर्ड वाचू शकणार नाहीत.
फायदे | तोटे |
---|---|
अनलिमिटेड पासवर्ड स्टोर करू शकता. | एकच ब्राऊजर वापरावा लगेल. |
क्रोम वापरत असाल तर डार्क वेब मोनिटरिंग चं फीचर मिळतं. | क्लाऊड पासवर्ड मॅनेजर पेक्षा कमी सुरक्षित |
ऑटोमॅटिक सिंक होतात. | प्रायवसी खूप कमी आहे. |
ब्राऊजर कंपनी वाटलं तर तुमचे पासवर्ड पाहू शकतात | Zero Knowledge Architecture तंत्रज्ञान नाही. |
किंवा सरकारने तुमच्याबद्दल मागणी केली तर माहिती देऊ शकतात. | ब्राऊजर हॅक झाल्यावर पासवर्ड पण लीक होण्याची शक्यता आहे. |
क्लाऊड पासवर्ड मॅनेजर
सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे क्लाऊड बेस्ड पासवर्ड मॅनेजर. कारण यांना तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि मोबाईलमध्ये वापरू शकता. ब्राऊजरसाठी एक्सटेन्शन आणि मोबाईलसाठी यांची app असते. यात कसलीही अडचण येणार नाही.
तुमचे सर्व पासवर्ड ही एका क्लाऊड सर्व्हर सेव्ह असतात. आणि ते ऑटोमॅटिक sync होत असतात. पण एखादा चांगला पासवर्ड मॅनेजर वापरणं गरजेचे आहे. या कंपन्यांवर सायबर अटॅक होत असतात. ज्यात त्यांचे डेटाबेस हॅक केले जातात. जरी त्यांचे डेटाबेस हॅक झाले तरी हॅकर तुमच्याबद्दल आणि तुमच्या पासवर्डबद्दल काहीच मिळणार नाही. फक्त ती कंपनी जिरो नॉलेज आर्किटेक्चर चा वापर करत असली पाहिजे.
हे सुरक्षित असण्याचं कारण म्हणजे तुमच्या डिवाइसमध्ये जरी मॅलवेअर घुसला तरी त्याचा या क्लाऊड पासवर्ड मॅनेजर वर फरक पडत नाही. तुम्हाला फक्त एक मास्टर पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. तो चांगलाच स्ट्रॉंग असला पाहिजे कारण या पासवर्ड मुळे तुमचे इतर पासवर्ड सुरक्षित राहतील.
फायदे | तोटे |
---|---|
अनलिमिटेड पासवर्ड स्टोर करू शकता. | मास्टर पासवर्ड विसरलात तर संपलं सगळं. |
बहुतांश कंपन्या Zero Knowledge Architecture तंत्रज्ञान वापरतात. | इंटरनेट लागेल. |
म्हणून कंपनी ब्रीच जरी झाली तरी पासवर्ड लीक होणार नाही. | काही फीचर्ससाठी पैसे द्यावे लागतील. |
ऑटोमॅटिक सिंक होतात. | काही मॅनेजर पासवर्ड साठी मर्यादा ठेवतात. |
एंड टू एंड एंक्रिप्शन पद्धत वापरतात. | |
हे सुरक्षित असतात का?
हो. जास्तीत जास्त पासवर्ड मॅनेजर जे नामांकित आहेत ते सुरक्षित असतात. ते वेगवेगळे अल्गॉरिथ्म वापरतात जेणेकरून तुमचे पासवर्ड सुरक्षित राहतात.
सध्या जवळपास सगळेच पासवर्ड मॅनेजर AES एंक्रिप्शन पद्धत वापरतात. जे की सध्या सगळ्यात मजबूत आहे. आणि याचा वापर सगळीकडे होत आहे.
Zero Knowledge Architecture- हे तंत्रज्ञान सध्या खूप कमी कंपन्या वापरतात. जर अशा कंपन्या हॅक झाल्या तर तुमचे पासवर्ड पण लीक होतील. जे या तंत्रज्ञानचा वापरतात त्यांचे सर्व्हर जरी हॅक झाले तरी पासवर्ड हॅक होणार नाहीत.
तुम्हाला फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. ज्याला मास्टर पासवर्ड असं म्हणतात. तो फक्त तुम्हालाच माहीत असतो चांगल्या कंपन्या याला सेव्ह करत नाहीत. त्यामुळे याला विसरून चालणार नाही.
तुम्ही टू स्टेप वेरीफीकेशन चा वापर करून मॅनेजरचं अकाऊंट अजून सुरक्षित ठेऊ शकता. त्यामुळे तुमच्याशिवाय दुसरं कुणीच लॉगइन करू शकणार नाही.
पासवर्ड मॅनेजर वापरण्याचे तोटे काय आहेत?
तुमचे सगळे पासवर्ड एकाच ठिकाणी असल्याने जर कधी तुमचा पासवर्ड मॅनेजर हॅकक झाला तर सगळे अकाऊंट धोक्यात येतील. पण जर टू स्टेप verification चालू असेल मग कसलाच धोका नसणार. जर तुम्ही यात क्रेडिट कार्ड नंबर आणि महत्तवाचे नोट्स सेव्ह केले असतील तर मग ते उघड पडू शकतात.
तुम्ही जर विचार न करता कोणताही पासवर्ड मॅनेजर वापरत असाल तर ते पण धोकादायक आहे. ते स्वतः पण कदाचित तुमचे पासवर्ड चोरत असतील. प्ले स्टोअर वर पण असे खूप apps सापडतील. त्यामुळे विचार करूनच कोणतंही app डाउनलोड करा.
जर तुम्ही लोकल पासवर्ड मॅनेजर वापरत असाल तर मग त्याला मॅलवेअर चा धोका असतो. पण जर vault encrypted असेल तर मग तुमच्या मास्टर पासवर्ड शिवाय त्याला हॅक केलं जाऊ शकणार नाही.
पासवर्ड मॅनेजर वापरताना तुम्हाला फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. हा पासवर्ड तुमच्या vault ची एंक्रिप्शन की असते. त्यामुळे जर तो पासवर्ड विसरला तर मग तुमचे सगळे पासवर्ड गेले म्हणून समजा.
जर कंपनीचं सर्व्हर डाऊन झालं असेल किंवा तुमचं इंटरनेट कनेक्शन वीक असेल तर मग मॅनेजर वापरण्यासाठी तुम्हाला अडचण होऊ शकते.
आदर्श पासवर्ड कसा असावा?
जर तुमचे अकाऊंट कमी असतील किंवा तुम्हाला पासवर्ड मॅनेजर वापरायचा नसेल तर तुम्ही खालील गोष्टी करा.
पासवर्ड मध्ये कधीही स्वतःच्या माहितीचा वापर करू नका. जसं तुमचं नाव, गाव, फोन नंबर इत्यादी.
पासवर्ड कमीत कमी १० charactersचा ठेवा ज्याने त्याला crack करणं थोड्या प्रमाणात अवघड जाईल.
पासवर्ड मध्ये small letters, capital letters, special characters आणि अंकांचा वापर करत जा. काही ठिकाणी emoji चा पण वापर करू शकता.
जर पासवर्ड लक्षात ठेवणं अवघड जात असेल तर तुम्ही पास फ्रेज चा वापर करू शकता.
पासवर्ड कधीच कुठे पण लिहून ठेऊ नका. कागदावर किंवा डायरीत तर मुळीच नाही.
शक्य तिथे टू स्टेप verification किंवा multi factor authentication चा वापर करा.
पासवर्डला कधीच कुठल्याही कागदावर किंवा असुरक्षित app मध्ये लिहू नका.
पास फ्रेज मध्ये तुम्ही एखादं वाक्य किंवा मोठ्या शब्दांचा वापर करू शकता. उदाहरणार्थ cyberbandhu lai bhaari याला तुम्ही cYb€₹B@ndhuLa1Bh@@r11 अशा प्रकारे तुम्ही पास फ्रेज तयार करू शकता. अशा प्रकारच्या पासवर्डला crack करण्यासाठी हॅकर ला खूप जन्म घ्यावे लागतील.
Leave a Reply