मोबाईल सुरक्षा टिप्स मराठी | Mobile Security Tips Marathi

·

·

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

मोबाईल हॅक झालाय का?

Mod Apk

जेव्हा पण एखादी app बनवली जाते तेव्हा त्याला खूप खर्च येतो. जसा- त्याला बनवणे, त्याला होस्ट करणे, नंतर त्यात बदल करणे, त्याची जाहिरात पण करावी लागते आणि जर ott असेल तर मग त्यावर जे पण चित्रपट असतील त्यांचे हक्क खरेदी करण्यासाठी पण पैसे द्यावे लागतात. यासाठी खूप पैसा जातो. 

पण जर एखादा व्यक्ती तुम्हाला या सर्व गोष्टी फुकट देत असेल तर मग त्यात गडबड घोटाळा असू शकतो. कारण ही कलयुग आहे आहे आणि सध्या तर लोकांच्या महितीला सोन्यापेक्षा जास्त भाव आहेत. अशा apps तुमच्या नकळत तुमची माहिती पण चोरू शकतात. आणि ही माहिती मग डार्क वेब वर झळकते. याला मग स्कॅमर किंवा हॅकर विकत घेतात. 

play store icon

त्यामुळे अशा apps पासून दूर रहा. पण जर तुम्ही अॅंटीवायरस वापरत असाल आणि जर त्याने ही app सुरक्षित आहे असं जरी सांगितलं तरी ती app वापरू नका. कारण अॅंटीवायरस कडे कदाचित माहितीचा अभाव असू शकतो किंवा तो वायरस नवीन असल्याने अॅंटीवायरसला माहीत नसेल. म्हणून यांचा वापर टाळाच. ही जे mod apk बनवतात त्यांना किमान सर्व्हर चा खर्च तर लागत असेलच याचा पैसा ते तुमच्याकडूनच घेतील. 

पर्मिशन मॅनेजर

तुम्ही बऱ्याच apps इंस्टॉल करता आणि जर ती app मागेल ती पर्मिशन तुम्ही देत असाल तर सावधान रहा. कारण कोणती पर्मिशन देताय आणि खरंच त्याची गरज त्या app ला आहे का ते बघा. कारण फेसबूकला तुमच्या कॉन्टॅक्ट्सची आणि लोकेशनची कसलीच गरज नसते. याचा वापर करून ते तुम्हाला ads दाखवतात. त्यामुळे याचा विचार करा.

जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही कोणत्या appला कोणती पर्मिशन दिली आहे यासाठी मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा तिथे पर्मिशन मॅनेजर हा पर्याय दिसेल नाही तर सर्च करा. त्यात तुम्ही कोणती पर्मिशन कोणत्या app ला आणि किती apps ला दिली आहे ते बघू शकता. आणि नको ती पर्मिशन काढून टाका. 

वायफाय

कोणताही वायफाय सुरक्षित असतो ही अंधश्रद्धा आहे. खास करून पब्लिक वायफाय ही सुरक्षित असतील यावर तर विश्वासच ठेऊ नका. ते फुकटच यासाठी असतात की प्रत्येक जण त्याला कनेक्ट करतील आणि मग हॅकर तुमची माहिती चोरून घेतो. त्यामुळे पब्लिक वायफाय वापरणं टाळा. 

wifi icon

ब्ल्युटूथ

वायफाय आणि ब्ल्युटूथ यांचे ऑटो स्कॅन बंद करून ठेवत जा. कारण जर ही ऑटोमॅटिक कोणत्याही फोनला आणि वायफायला कनेक्ट झाले तर ते तुमच्या मोबाईल मध्ये वायरस किंवा मॅलवेअर इंस्टॉल करू शकता. त्यामुळे खास करून सार्वजनिक ठिकाणी बंदच ठेवत जा. अशाने तुमची बॅटरी पण वाचेल. 

डिवाइस रूट

तुम्ही जो सध्या फोन वापरताय त्यात काही सुरक्षा वापरली जाते जेणेकरून कुणीही तुमची माहिती चोरू नये. पण जर ही सुरक्षा काढायची असेल तर मग तुम्हाला फोन रूट करावा लागेल. मग तुमच्या फोनची सुरक्षा शून्य होईल. तुम्ही त्यात हवे ते बदल करू शकता. जसे सिस्टम चे app तुम्ही अनइनस्टॉल करू शकत नाहीत पण रूट केल्यानंतर ते तुम्ही अनइनस्टॉल करू शकत. शिवाय एखादी app पण तुमच्या मोबाईल मध्ये काही बदल करू शकते. त्यामुळे फोन रूट करू नका. 

चार्जिंग

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल फक्त तुमच्या स्वतःच्या चार्जरनेच चार्ज करा. काही ठिकाणी फक्त यूएसबी केबलच असतात त्यामुळे तुमच्या कडे पर्याय नसतो. पण ही केबल घातक असू शकतात. त्याला कनेक्ट करताच क्षणी तुमच्या मोबाईलमध्ये मॅलवेअर इंस्टॉल होईल. मग तो तुमची माहिती चोरू शकतो. 

कॉल फॉरवर्डिंग

हा पर्याय जर चालू असेल तर मग तुमच्या मोबाईलवर येणारे कॉल्स आणि मेसेजेस दुसऱ्या क्रमांकावर ऑटोमॅटिक जातात. त्यामुळे तुमचे बँक otp पण त्याच नंबरवर जातील आणि पैसे गेलेले तुम्हाला कळणार पण नाहीत. यासाठी मोबईलच्या सेटींगमध्ये जा आणि तिथे कॉल फॉरवर्डिंग वर जाऊन बघा की दुसऱ्याचा तर नंबर नाही ना. 

Anydesk

कुठल्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ही app इंस्टॉल करायची नाही. किंवा अशी कुठलीही app इंस्टॉल करायची नाही. याच्या मदतीने तुमच्या फोनचा ताबा समोरच्या व्यक्तीकडे जातो आणि मग तो तुमच्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकतो. त्यामुळे अशा apps पासून सावध रहा. 

DNS

तुम्हाला जर एखाद्या वेबसाइटवर जायचं असेल तर तुम्ही त्या वेबसाइटचं नाव टाइप करून त्याला भेट द्याल. जसं cyberbandhu.in हे तुम्ही टाइप कराल. पण गूगलला हे नाव माहीत असतं. त्याला त्या वेबसाइटचा आयपी अॅड्रेस माहीत असतो. आणि गूगलला ते आयपी अॅड्रेस सांगण्याचं काम DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम करतं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. 

तुमच्या मोबाईलमध्ये dns सेट नसतो त्यामुळे हा एक धोका उद्भवू शकतो. कारण वायफायला कनेक्ट केलं असल्यावर हॅकर हे कंट्रोल करतो. त्यामुळे जी खाली सेटिंग सांगेन ती करून घ्या. 

मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा सर्च करा प्रायवेट dns त्यावर क्लिक करा तिथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील त्यापैकी तिसऱ्या पर्यायवर क्लिक करा आणि तिथे one.one.one.one हे टाइप करून सेव्ह करा. ही dns cloudflare या कंपनीचं आहे. आणि खूप मोठी cyber security कंपनी आहे. 

व्हीपीएन

व्हीपीएन चं मुख्य काम तुमचं आयपी अॅड्रेस बदलणं आहे आणि सोबतच तुमची माहिती एनक्रिप्ट करणं पण आहे. कारण पब्लिक वायफाय वापरताना तुम्ही कोणत्या वेबसाइटवर जाताय काय माहिती भरताय हे सर्व हॅकर पाहू शकतो. त्यामुळे तुमचे पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड नंबर लीक होतात. अशावेळी एक चांगला व्हीपीएन तुमची सर्व माहिती एनक्रिप्ट करण्यास मदत करतो. साधं एंक्रिप्शन नाही तर २५६ बीट AES या पद्धतीचा वापर एक चांगला व्हीपीएन करतो. त्यामुळे फुकट व्हीपीएन च्या नादात पडू नका. ते तुमची माहिती एनक्रिप्ट करतात का पण ही माहीत नाही. 

व्हीपीएन -सायबर बंधू

मोबाईल अॅंटीवायरस

तुमच्या मोबाईलमध्ये अॅंटीवायरस असणं गरजेचं आहे. जर कुणी म्हणत असेल की मोबाईलला अॅंटीवायरसची गरज नाही तर त्याच्याशी संबंध तोडा. कारण आता मॅलवेअर आणि वायरस हे खूप प्रगत होत आहेत त्यामुळे जमलं तर विकत घ्या नाही तर फुकट मध्ये पण काही अॅंटीवायरस मिळतात जे काही प्रमाणात तुम्हाला नक्की वाचवतील. 

पासवर्ड मॅनेजर

तुम्ही जर खूपच साधे पासवर्ड वापरत असाल तर ते थांबवा आणि जर पासवर्ड लक्षात राहत नसतील तर पासवर्ड मॅनेजरचा वापर करा. किमान ब्राऊजर मध्ये जो पासवर्ड मॅनेजर असतो त्याचा तरी वापर करा.

password

Multi Factor Authentication

फक्त चांगला पासवर्ड वापरुन काहीही होणार नाही. शक्य असेल तर प्रत्येक अकाऊंटला टू स्टेप verification चालू करा. याने जरी तुमचा पासवर्ड लीक झाला तरी तो हॅक होणार नाही. 

डार्क वेब मॉनिटरिंग

जरी तुम्ही सर्व खबरदारी बाळगत असाल तरी तुमची माहिती डार्क वेब वर लीक होण्याची शक्यता आहे. कारण कंपन्या हॅक होत असतात त्यांच्या डेटा ब्रीच आपली माहिती लीक होत असते. त्यामुळे जेव्हा अशी बातमी ऐकाल तेव्हा तुमचे पासवर्ड लगेच बदला. 

App Update

एक तर मुख्य गोष्ट म्हणजे आवश्यक त्याच apps वापरा उगाच बिनकामाच्या apps इंस्टॉल करू नका. आणि दुसरं म्हणजे सगळ्याच apps वेळोवेळी अपडेट करत रहा. कारण प्रत्येकवेळी अपडेट मध्ये जरी नवीन फीचर्स नसले तरी त्यात security अपडेट असतात. आणि मोबाईल पण नेहमी अपडेट करत रहा. 

डेटा बॅकअप

मोबईलमधील तुमचे फोटो आणि महत्त्वाच्या फाइल नेहमी बॅकअप करत जा. यासाठी तुम्ही क्लाऊड स्टोरेजचा वापर करा. टेलेग्राम वर अजिबात अपलोड करू नका. ते एंड टू एंड एनक्रिप्ट नसतात. तुमच्या फाइल सुरक्षितपणे सर्व्हरवर अपलोड होतील पण नंतर सर्व्हरवरील सर्व माहिती कंपनीचे अधिकारी वाचू शकतात.

cloud storage icon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जॉइन आणि फॉलो करा

Latest post