फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
सन १९७६ ची गोष्ट आहे, तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. एकमेकांना कसं मागे टाकून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाता येईल याची टी स्पर्धा होती. मॉस्को मधील अमेरिकेच्या कार्यालयात त्यांचा एक अधिकारी रोजच्या प्रमाणे कार्यालयात आला. आणि तो अहवाल लिहू लागला. त्यावेळी कॉम्प्युटर एवढे वापरात नव्हते म्हणून तो आयबीएम चा एक टाइपरायटर वापरायचा. त्याला तो सुरक्षित आहे असं वाटायचा. पण त्या दिवशी त्याच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली आणि त्याला वाटलं की त्याचा प्रत्येक शब्द हा रेकॉर्ड होत आहे.
मुद्दे
त्याचा तो टाइपरायटर सोव्हिएत रशियाने किलॉगर च्या मदतीने हॅक केला होता. हा जगातला पहिला keylogger होता. ही गोष्ट कळायला अमेरिकेला आठ वर्ष लागली होती.
किलॉगर म्हणजे काय?
किलॉगर हे एक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर असतो जो आपण कॉम्प्युटर वर काय टाइप करत आहोत ही तो रेकॉर्ड करत असतो. फक्त कॉम्प्युटरच नाही तर मोबईलसाठी पण किलॉगर आहेत. त्यामुळे मोबाईल सुरक्षित असतो हा भ्रम ठेऊ नका. मोबईलमधील किलॉगर आपण काय टाइप करतोय कुठे टॅप करतोय, आपलं स्वाइप करणं या गोष्टी तो रेकॉर्ड करत असतो.
माहिती चोरून काय करतो?
याचं मुख्य काम तर आपली माहिती चोरणं असतं. यात ते आपले यूजरनेम, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर्स, आपण काय चॅटिंग करताय या सर्व गोष्टी किलॉगर चोरतात. याचा वापर ते आपल्याला फसवण्यासाठी पण करू शकतात. शिवाय आपला यूजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले जाऊ शकतात. जर टू स्टेप verification चालू नसेल तरच. किंवा आपल्या चॅटिंगच्या आधारे ब्लॅकमेल करण्याची शक्यता पण नाकारता येणार नाही.
किलॉगरचे प्रकार
सॉफ्टवेअर
याचे दोन प्रकार आहेत. पहिला सॉफ्टवेअर किलॉगर आहे. ही सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणात वापरात आहेत. हा तुमच्या ब्राऊजर मध्ये एक्सटेन्शन किंवा एखादा cracked सॉफ्टवेअर मध्ये पण येऊ शकतो. त्यामुळे अनोळखी एक्सटेन्शन आणि कुठलेही cracked सॉफ्टवेअर अजिबात वापरू नका.
हार्डवेअर
दुसऱ्या प्रकारात हार्डवेअर येतात. ही एक यूएसबी च असतात. जे आपल्या कीबोर्ड ला जोडलेले असतात. जे कदाचित तुम्हाला एखाद्या कॅफेमध्ये दिसू शकतात. किंवा तुम्ही काय टाइप करताय ही पाहण्यासाठी कॅमेऱ्याचा पण वापर होऊ शकतो. त्यामुळे कॅफेमध्ये स्वतःचे अकाऊंट ने कधीच लॉगिन करू नका.
- फोन हॅक झालाय तर या गोष्टी करा
- फायरवॉल म्हणजे काय?
- व्हीपीएन म्हणजे काय?
- इंटरनेट सुरक्षा टिप्स
- डार्क वेब म्हणजे काय?
हे मॅलवेअर आहे का?
हो. हे मॅलवेअर असतात. तुम्ही कोणत्याही वेबसाइटवरून जर फाइल डाउनलोड करत असाल तर त्यात किलॉगर असू शकतो. शिवाय हे स्वतःचा ड्यूप्लिकेट बनवून इतर कॉम्प्युटरला पण इनफेक्ट करू शकतात.
हे आपल्यापर्यंत कसे पोहोचतात?
Malvertising
यात खुपशा हॅक झालेल्या वेबसाइटवर हॅकर्स त्यांचे ads चालवतात. त्यात नकळत ते एखादी फाइल डाउनलोड करण्यात यशस्वी झाले तर किलॉगर किंवा इतर मॅलवेअरचा हल्ला करू शकतात.
फिशिंग
जर तुम्ही ईमेलचा खूप वापर करत असाल तर मग तुम्हाला पण टार्गेट केलं जाऊ शकतं. यात किलॉगर किंवा इतर मॅलवेअर तुमच्याकडून डाउनलोड केलं जाऊ शकतं.
Zero Day Exploit
तुमच्या सिस्टम मधील vulnerability चा किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मधील vulnerability चा फायदा घेऊन ही इंस्टॉल होऊ शकतं.
Screen scrapers
हा किलॉगर तुमच्या स्क्रीनचा सतत स्क्रीनशॉट घेत असतो. त्यामुळे पण तुमचे चॅट्स किंवा पासवर्ड लीक होत असतात.
कायदेशीर की बेकायदेशीर ?
याचा कायदेशीररित्या पण वापर केला जातो. जसं एखाद्या मोठ्या कंपनीत जर तुम्ही कंपनीचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरत असाल तर मग त्या ठिकाणी याचा वापर केला जात असेलच. आणि तो कायदेशीररित्या योग्य आहे. आणि म्हणूनच तुम्ही कंपनीच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वर कधीच स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंट ने लॉगिन नाही केलं पाहिजे आणि चॅटिंग पण केली नाही पाहिजे.
बेकायदेशीर
यात जर तुमच्या नकळत कुणी किलॉगर इंस्टॉल केला असेल तर ते बेकायदेशीरच आहे. याच्या मदतीने मग तुमचे अकाऊंट हॅक करणे, नेटबँकिंग पासवर्ड लीक झाला तर कदाचित पैसे पण काढून घेतले जाऊ शकतात.
किलॉगर कसा ओळखावा?
सर्वात आधी तर कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये अशी कोणती app आहे का जी तुम्ही इंस्टॉल केलीच नाही ती बघा अन् जर असेल तर लगेच डिलीट करा.
तुमचा लॅपटॉप फ्रीज होत असेल, क्रॅश होणं किंवा स्लो काम करणं खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही कीबोर्डचा किंवा माऊस चा वापर करत असाल.
कॅफे मध्ये बघा की कीबोर्ड ला कुठे एखादा वेगळाच डिवाइस तर जोडलेला नाही ना किंवा तो कीबोर्ड दिसेल अशा ठिकाणी कॅमेरा तर नाही ना.
टास्क मॅनेजरचा वापर तुम्ही करू शकता. अनोळखी प्रोसेस जर बॅकग्राऊंड मध्ये होत असेल तर ती थांबवा आणि वेळोवेळी तपासत रहा.
उगाच कोणतेही ब्राऊजर एक्सटेन्शन वापरत जाऊ नका. या एक्सटेन्शनच्या मदतीने तुमचा ब्राऊजर तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकतो.
आपण कसं सुरक्षित राहू शकतो?
टू स्टेप वेरीफिकेशन
तुमच्या प्रत्येक सोशल मीडिया आणि ईमेल अकाऊंट ला टू स्टेप verification चालू करा. याने जरी तुमच्या पासवर्ड लीक झाला तरी टू स्टेप verifications मुळे अकाऊंट हॅक होणार नाही.
अॅंटीवायरस
एखादं चांगलं अॅंटीवायरस नक्की वापरा. मायक्रोसॉफ्टच मॅलवेअर removal टूल आणि defender वर अवलंबून राहू नका. किंवा इतर कोणत्याही फुकट अॅंटीवायरसवर पूर्णपणे विश्वास ठेऊ नका. एखादा चांगला अॅंटीवायरस नक्की विकत घ्या.
फाइल
कसलीही फाइल डाउनलोड करण्याआधी १० वेळ विचार करा. मग परत एकदा विचार करा. मग फाइल डाउनलोड करा. अनोळखी ईमेल मधून तर फाइल अजिबात डाउनलोड करू नका.
पासवर्ड मॅनेजर
किलॉगर वर रामबाण उपाय म्हणजे पासवर्ड मॅनेजर. कारण ही ऑटोफिल सारख्या फीचर्ससह येतात. म्हणून पासवर्ड टाइप करण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे पासवर्ड लीक होणार नाही.
काढून टाका
जर तुमच्या डिवाइसमध्ये किलॉगर असेल तर अॅंटीवायरसचा वापर करून काढून टाका आणि जरी यानंतर पण तुम्हाला शंका असेल तर डिवाइस फॅक्टरी reset करा. विंडोजला Clean इंस्टॉल करा.
विंडोज कीबोर्ड
एक virtual कीबोर्ड विंडोज मध्ये पण असतो win+ctrl+o दाबून त्याचा वापर करू शकता पण तो encrypted नाही तो फक्त हार्डवेअर किलॉगर पासून तुम्हाला वाचवेल.
Virtual Keyboard
अजून एक ब्रम्हास्त्र म्हणजे virtual कीबोर्ड वापरणे. ते पण encrypted असले पाहिजेत. नाही तर त्याचा काहीच फायदा नाही आणि खास करून बँकिंग वेबसाइटवर त्यांचे स्वतःचे encrypted virtual कीबोर्ड असतात. त्यांचा वापर नक्की करा. जर तुमच्याकडे kaspersky अॅंटीवायरस असेल तर त्यात virtual कीबोर्ड मिळतो तुम्ही त्याचा वापर पासवर्ड भरताना करू शकता.
पासवर्ड
जरी तुम्ही पासवर्ड मॅनेजर वापरत असाल तरी ठराविक कालावधीने पासवर्ड बदलत जा. याने तुमचं अकाऊंट हॅक होण्याची शकता कमी होते. तसं तर तीन महिन्यांनी पासवर्ड बदलण्यास सांगितलं जातं. पण तुम्ही जर खूपच जास्त प्रमाणात इंटरनेट वापरत असाल तर प्रत्येक महिन्याला पासवर्ड बदला.
Leave a Reply