फोन हॅक झालाय तर या गोष्टी करा

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

जोपर्यंत एक मानवी मेंदू फोन चा वापर करत आहे तोपर्यंत तो फोन हॅक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्या फोनबद्दलच आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे फोन हॅक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर अँड्रॉईड वापरत असाल तर मग खूपच जास्त आहे. 

फोन हॅक

 असं का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्याचं उत्तर आहे वापरणाऱ्यांची संख्या. ios पेक्षा अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचे फोन वापरणारे जगभरात जास्त आहेत. त्यामुळे हॅकर्स पण यांनाच निशाण्यावर धरतात. ios वापरकर्त्यांची संख्या पण सध्या भारतात खूप वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हॅकर्स यांना पण लक्ष करतील. 

os chart

फोन हॅक झाला आहे ही कसं कळणार?

बॅटरी

फोनची बॅटरी किती वेळ चालते ही आपल्याला नक्कीच माहीत असते. पण तुम्ही जास्तीचे apps पण डाउनलोड केले नाहीत अन् फोनची बॅटरी पण खूप लवकर किंवा आधीपेक्षा जास्त लवकर संपत असेल तर मग समजून जा फोन हॅक झाला आहे. करण जो पण वायरस किंवा मॅलवेअर तुमच्या मोबाईल मध्ये घुसलाय तो सतत तुमची माहिती त्याच्या मालकाकडे पाठवत असतो. त्यामुळे फोनची बॅटरी जास्त वापरली जाते आणि तुम्ही काहीही वापर न करता बॅटरी गरम होते. 

इंटरनेट

जरी तुमच्याकडे अनलिमिटेड इंटरनेट किंवा वायफाय असेल तरी तुम्ही किती इंटरनेट वापरता आहात किंवा दिवसाला खरंच एवढं इंटरनेट वापरण्यात आला आहे का याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या वायरस आणि मॅलवेअर यांना तुमची माहिती त्यांच्या मालकाकडे पाठवण्यासाठी पण इंटरनेट लागणारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचे आहे. 

नको त्या apps

अचानक जर तुम्हाला स्क्रीन वर तुम्ही इंस्टॉल न केलेल्या apps दिसत असतील तर त्या डिलीट करा. आणि सेटिंग्स>apps मध्ये जाऊन इंस्टॉल केलेल्या वर जाऊन बघा की अशी कोणती app आहे जी तुम्ही कधी डाउनलोडच केलेली नाही. 

स्लो फोन

मॅलवेअर घुसलाय म्हणजे तो पण तुमचा प्रॉसेसर वापरणार म्हणजे फोन स्लो होईल. जर हा पण बदल तुमच्या फोन मध्ये होत असेल तर हा उपद्रव वायरस किंवा मॅलवेअरचा आहे. 

Ads

जर तुम्हाला फोनमध्ये पूर्वीपेक्षा जास्तच ads दिसत असतील तर तुमच्या फोनमध्ये adware हा मॅलवेअर असू शकतो. यानेच लोकांना ads दाखवल्या जातात. पण हा हल्ला शाओमी किंवा रेडमी च्या फोनमध्ये कळणं अवघड आहे. कारण या कंपन्या स्वतः त्यांच्या फोन मध्ये ads दाखवतात. त्यामुळे स्वतः फोन घेत असाल तर जरा विचार नक्कीच करा. 

Mod Apk

तुम्ही काही गोष्टी फुकट मिळाव्यात म्हणून जर mod apk वापरत असाल तर ते मॅलवेअर किंवा वायरस असण्याची शक्यता आहे. कारण एखादी कंपनी तुमच्याकडून पैसे घेत आहे म्हणजे त्यांना पण कुठे ना कुठे तरी द्यावे लागत असतीलच. आणि हा खर्च मोठा असतो त्यामुळे दुसरं कुणीतरी तुम्हाला त्याच वस्तु फुकटात का देईल. त्याला पण काही ना काही तरी खर्च नक्कीच लागत असेल. तो अंबानी सारखा दिलदार नसेल की सगळं काही फुकट देईल. त्यामुळे तो कदाचित तुमची माहिती पण चोरत असेल ही लक्षात घ्या. 

काहीच नाही  

तुमच्या फोनमध्ये जर वरीलपैकी एकही गोष्ट होत नाही पण तुम्ही जर mod apk, pirated सॉफ्टवेअर किंवा कोणत्याही वेबसाइटवरून फाइल डाउनलोड करून वापरत असाल तरी पण फोन हॅक होण्याची शक्यता आहे. कारण काही मॅलवेअर ही अॅंटीवायरसच्या पण तावडीत येत नाहीत. मग आपल्याला तरी काय कळणार. त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात हा विचार सोडाच. 

apps क्रॅश 

तुमच्या मोबाईलमध्ये ram पण जास्त आहे, प्रॉसेसर पण चांगला आहे, फार जुना फोन पण नाही तरी apps क्रॅश होत असतील तर ही फोन होण्याची लक्षणं आहेत. 

वेबसाइट

फोन हॅक झाल्यावर तुम्ही उघडत असलेल्या वेबसाइट पण तुम्हाला पण वेगळ्या दिसू शकतात. कारण हॅकर्स जशास तशी त्याची वेबसाइट बनवून तुमच्या समोर ठेऊ शकतो आणि डिझाईन पण सारखीच असल्याने ते दुर्लक्षित पण होऊ शकतं. 

एसएमएस

अचानक जर तुमच्या फोनवरून मेसेज आणि फोन येणं बंद झाले असतील तर ही धोक्याची घंटा आहे. कारण मग तुमच्या बँकेचे otp पण त्याच्याकडेच गेले असतील. आणि तुमच्या खात्यातील पैसे गेलेले पण तुम्हाला कळणार नाहीत. 

दुसऱ्यांना एसएमएस

एक तर तुम्हाला एसएमएस येत नसतील ही होईल किंवा मग तुमच्या मोबाईलवरून दुसऱ्यांना एसएमएस जात आहेत जे तुम्ही पाठवलेले नाहीत. या दोन गोष्टी घडू शकतात. 

सेटिंग्स app

जर तुमची सेटिंग्सची app उघडतच नसेल किंवा प्रत्येक वेळा क्रॅश होत असेल तर मग नक्कीच तुमचा मोबाईल हॅक झाला आहे. कारण असेही खूप मॅलवेअर आहेत जे सेटिंग्सची app उघडूच देत नाहीत. 

फोन हॅक झाला असेल तर काय करावं?

जरी तुमचा फोन हॅक झाला नसेल तर हॅक होण्याची वाट पण बघू नका त्यासाठी खालील गोष्टी करा. 

अॅंटीवायरस आयकॉन -सायबर बंधू

एक चांगल्या नामांकित कंपनीचा अॅंटीवायरस इंस्टॉल करा. आणि जर विकत घेतलेला असेल वापरत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जर केलेलं नसेल तर आताच करा. मोफत असलं तरी चालेल पण करा. 

एक हॅकर फिशिंगच्या मदतीने माहिती चोरत आहे. -सायबर बंधू

जेव्हा तुम्हाला शंका येईल की फोन हॅक झाला आहे तर तेव्हा इंटरनेट बंद करा आणि मग अॅंटीवायरस ने मोबाईल पूर्णपणे स्कॅन करून घ्या. जर अॅंटीवायरस इंस्टॉल केलेल्या नसेल तर तो आधी इंस्टॉल करून घ्या. 

authentication

जेव्हा कधी पण तुमचा मोबाईल किंवा सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाला असेल तर इतरांना पण सांगा की हॅक झाला आहे आणि त्या मोबाईल आणि सोशल मीडिया वरून आलेले सर्व मेसेज दुर्लक्षित करा. 

password

तुम्ही अॅंटीवायरस च्या मदतीने मॅलवेअर काढल्यानंतर सगळ्या अकाऊंटचे पासवर्ड लगेच बदलून घ्या. आणि शक्य तिथे multi factor authentication चालू करा. आणि सोपे पासवर्ड अजिबात वापरू नका. यासाठी पासवर्ड मॅनेजरचा वापर करा. एकच पासवर्ड सगळीकडे वापरू नका.

हॅकर एक वेबसाइट वर हल्ला करत आहे -सायबर बंधू

जर काहीही केल्या वायरस जात नसेल तर मग तुमच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे फोन रिसेट करणे. अशावेळी फक्त फोटो, कॉन्टॅक्ट्स, विडियो अशाच गोष्टींचा बॅकअप घ्या.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *