फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
सध्या फार कमी असेल लोकं असतील जे इंटरनेट वापरत नसतील. तुम्ही पण जर रोज इंटरनेट वापरत असाल तर तुमच्यावर पळत ठेवली जात आहे. हे कोण ठेवतं? पहिल्या क्रमांकावर येतं ते म्हणजे गूगल, मग ब्राऊजर जे तुम्ही वापरताय. जसं क्रोम, मायक्रोसॉफ्ट एड्ज. हे पण तुमच्या वर पाळत ठेवत असतात. यानंतर मग जे तुम्हाला इंटरनेट देतात जसं सीम कंपन्या, वायफाय वाले हे पण तुमची माहिती गोळा करत असतात.
मुद्दे
तुम्ही कोणत्या वेबसाइटवर जाताय या गोष्टी ते पाहू शकतात. मग जर तुम्ही पब्लिक वायफाय वापरत असाल तर मग तो वायफाय एखाद्या हॅकर चा असू शकतो. पण तुमच्या घरातलं आणि ऑफिसमधील वायफाय फक्त तुम्ही कोणत्या वेबसाइट ला भेट दिली हेच पाहू शकतं. मग येतात वेबसाइट ज्या तुम्हाला ट्रॅक करत असतात. याने त्या तुम्हाला जाहिरात दाखवत असतात. या सर्व याच्यातून वाचण्यासाठी व्हीपीएन चा वापर केला जाऊ शकतो.
व्हीपीएन म्हणजे काय?
याचा फुल फॉर्म व्हर्च्युअल प्रायवेट नेटवर्क असा आहे. तुम्ही जर कोणत्याही वेबसाइटला भेट देत असाल तर त्यांच्याकडे तुमचा आयपी अॅड्रेस जातो. हा खूप महत्वाचा असतो. याने तुमची लोकेशन त्यांना काळात असते.
व्हीपीएन काम कसं करतं?
यांचे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे देशात कंपण्यांचे सर्व्हर असतात. तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्हीपीएन शी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला एक नवीन आयपी अॅड्रेस मिळतो. समजा जर तुम्ही अमेरिकेतील सर्व्हर ला कनेक्ट केलं तर गूगल, इंटरनेट कंपनी आणि वायफाय यांना तुम्ही अमेरिकेत आहात एवढेच दिसेल. तुम्हाला अमेरिकेचा आयपी अॅड्रेस मिळतो. मग तुम्ही काहीही सर्च केलं तरतुम्हाला रिजल्ट पण अमेरिकेचेच दिसतात.

या प्रक्रियेत तुम्ही जर काही सर्च केलं तर तुमची रीक्वेस्ट त्या सर्व्हर कडे जाते तो सर्व्हर मग सर्च रिजल्ट तुम्हाला देतो. याने कोणालाही फक्त त्या सर्व्हरचीच माहिती दिसेल तुमची माहिती दिसणार नाही. तुमची माहिती पण सुरक्षित राहते.
आपली माहिती सुरक्षित कसं ठेवतं?
व्हीपीएन आपली वेगवेगळी माहिती उघड होण्यापासून वाचवतं.
ब्राऊजिंग हिस्टरी
तुम्ही जेव्हा पण इंटरनेट वर काही सर्च करता तेव्हा खूप जणांना तुम्ही काय करताय ही कळतं. त्यात मग गूगल, ब्राऊजर, इंटरनेट पुरवणारी कंपनी आणि जर पब्लिक वायफाय असेल तर सर्वच आणि जर घरचं किंवा ऑफिस मधील वायफाय असेल तर कोणत्या वेबसाइटला भेट देताय हे पण त्यांना कळेल.
यात सगळ्यात महत्वाचं असतं ते आयपी अॅड्रेस. या कंपन्या तुमच्या आयपी अॅड्रेस वर तुम्ही काय सर्च केलंय ही सगळं नोंद करून ठेवतात आणि मग नंतर याचा वापर तुम्हाला जाहिरात दाखवण्यासाठी करतात. ते कसं?
- फिशिंग म्हणजे काय?
- इंटरनेट सुरक्षा टिप्स
- बॉटनेट म्हणजे काय?
- मॅलवेअर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
- डार्क वेब म्हणजे काय?
समजा तुम्ही आता जरी व्हीपीएन म्हणजे काय हे सर्च करून या वेबसाइटवर जर आला असाल तर मग तुम्हाला काहीच वेळात यांच्या कंपन्यांचे जाहिरात दिसण्यास सुरुवात होईल.
चला याने काही अडचण होणार पण जर तुम्ही तुमच्या एखाद्या आजाराबद्दल सर्च केलात तर नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल जाहिरात दाखवली जाईल. शिवाय इतर वैद्यकीय कंपनीला तुमची माहिती विकली पण जाऊ शकते.
आयपी अॅड्रेस आणि लोकेशन
कोणतीही कंपनी किंवा वेबसाइट जो ट्रॅकर वापरत असतात त्या तुमच्या ब्राऊजरच्या मदतीने तुमचा आयपी अॅड्रेस कॅप्चर करतात. याने तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करतात आणि तुम्ही कुठे होता सर्च करताना हे पण त्यांना कळतं.
पण व्हीपीएन वापरल्याने त्यांना हे काहीच कळणार नाही. शिवाय जरी तुम्हाला त्यांनी व्हीपीएनच्या आयपी अॅड्रेस वर ट्रॅक केलं तरी ते मग जाहिरात त्याच आयपी वर दाखवतील जे की तुम्ही व्हीपीएन बंद केल्यावर तुमच्याशी त्याचा काहीच संबंध राहणार नाही.
स्ट्रीमिंग
नेटफ्लिक्स, अॅमॅझाॅन यांच्यासारख्या apps वर तुम्ही वापरत असाल तर मग काही चित्रपट हे तुम्ही भारतात पाहू शकत नाहीत. मग अशावेळी याचा वापर करून ते चित्रपट पाहू शकता.
तुमचा डिवाइस
हा तुमचा डिवाइस सुरक्षित ठेवण्यात मदत करतो. जेव्हा पण तुम्ही पब्लिक वायफाय वापरत असता तेव्हा तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब्लेट ही अजिबात सुरक्षित नसतात. हॅकर हे टपुन बसलेले असतात. पण जर तुम्ही याचा वापर करून पब्लिक वायफाय वापरत असाल तर मग तुम्ही खूप सुरक्षित आहात. याच्या मदतीने तुमची माहिती एनक्रिप्ट होत असते. याने तुम्ही काय करत आहात हे हॅकर्स पाहू शकत नाहीत.
विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या?
तुम्हाला जर व्हीपीएन विकत घ्यायचाच असेल तर मग काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या खालीलपैकी
प्रायवसी पॉलिसी
याचा मुख्य उद्देश हा आहे की, तुमची माहिती सुरक्षित ठेवणे, तुम्ही काय सर्च करताय हे कुणालाही कळू न देणे हा आहे. पण जर व्हीपीएनच तुमची माहिती साठवत असेल तर मग काय फायदा? यामुळे व्हीपीएन विकत घेताना त्यांच्या पॉलिसी मध्ये नो लॉग पॉलिसी चा समावेश असला पाहिजे.
प्रोटोकॉल
ती कंपनी वायरगार्ड किंवा OpenVPN या प्रोटॉकॉल चा वापर करत असली पाहिजे. जे सध्या अद्ययावत आणि सुरक्षित आहेत. OpenVPN प्रोटोकॉल मध्ये आपली माहिती एनक्रिप्ट केली जाते त्याला डिक्रिप्ट करण्यासाठी जी key लागते ती प्रत्येक ७ मिनिटाला बदलते. जेणेकरून तुम्हाला याचा वापरताना हॅक करणं जवळपास अशक्य आहे.
डेटा लिमिट
जर एखादा व्हीपीएन विकत घेतला असेल तर त्याला वापरण्याची कसलीही लिमिट नसू नये. जर एखादा व्हीपीएन लिमीट ठेवत असेल तर तो घेऊ नका.
सर्व्हर लोकेशन
विकत घेत असताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला जे लोकेशन पाहिजे त्या देशात त्या व्हीपीएन चे सर्व्हर आहेत की नाही? जसं मला जर भारतातील सर्व्हर वापरायचे आहेत पण कंपनीकडे तिथे सर्व्हरच नाहीत तर तो विकत घेण्याचा काहीच फायदा नाही.

एकापेक्षा जास्त डिवाइस
तुम्ही घेतलेला व्हीपीएन हा एकाचवेळी जास्त डिवाइस वर वापरता यावा. म्हणजे एकाचवेळी इतर मोबाईल, लॅपटॉप वर वापरता यावा.
किंमत
महाग व्हीपीएन आहे म्हणून तुम्ही फुकट वाले तर आजिबात वापरू नका कारण ते वापरण न वापरण ही सारखंच आहे. कारण ते पैसा कमावण्यासाठी तुमची माहिती विकू शकतात. तुम्हाला जाहिरात दाखवू शकतात आणि कदाचित ते सुरक्षित पण नसू शकतात.
काही फीचर्स
व्हीपीएन मध्ये जर किल स्विच हे फीचर असलंच पाहिजे . जर व्हीपीएन वापरताना अचानक कनेक्शन तुटलं तर तुमची माहिती उघड होऊ शकते. पण या फीचरमुळे जेव्हा पण तुमचं कनेक्शन व्हीपीएन शी तुटेल तेव्हा या फीचरमुळे तुमचं ब्राऊजिंग तिथेच थांबेल तुमचा आयपी अॅड्रेस उघड होणार नाही.
सुरक्षा
व्हीपीएन च्या मदतीने तुम्ही मॅन इन द मिडल अटॅक पासून वाचू शकता. हा हल्ला खास करून पब्लिक वायफाय वापरत असताना होतो. पण व्हीपीएन वापरल्याने याच्यापासून तुम्ही वाचू शकता.

VPN चा फूल फॉर्म मराठीमध्ये काय आहे?
Virtual Private Network व्हर्च्युअल प्रायवेट नेटवर्क असा याचा फूल फॉर्म आहे.
Leave a Reply