फायरवॉल म्हणजे काय? | What is Firewall in Marathi?

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

फायरवॉल हे आपले रक्षक असतात. ज्या प्रकारे आपल्या घरांना भिंती असतात किंवा तुमची सोसायटीला एक कुंपण पण असेल यांचं मुख्य काम म्हणजे आपल्याला चोरांपासून सुरक्षित ठेवण्याचं असतं. हेच काम आपल्यासाठी फायरवॉल करतात. 

फायरवॉल

फायरवॉल म्हणजे काय?

तुमचा कॉम्प्युटर जर २४ तास इंटरनेटशी कनेक्टेड असेल तर तो प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या सर्वरशी जोडला जात असतो. ज्यात कदाचित घातक सर्वर पण असू शकतात. 

फायरवाल -सायबर बंधू

अशा सर्वर पासून वाचण्यासाठी याचा वापर केला जातो. हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही स्वरूपात आपल्याला मिळतो. हे आपल्या डिवाइसचं ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्याचं काम करत असतात. आपला लॅपटॉप कोणत्या ना कोणत्या सर्वरशी कनेक्ट होत असतो. त्याच्यावर तो पाळत ठेवत असतो. किंवा कुणीतरी तुमच्या डिवाइसशी कनेक्ट करून त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीये ना याच्यावर पण तो लक्ष ठेवत असतो. अन तसा प्रयत्न होत असेल तर त्याच क्षणी ते कनेक्शन तोडलं जातं. 

याने तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर सुरक्षित राहतो. एवढंच नाही तर ज्या वायफाय नेटवर्क शी तुम्ही कनेक्टेड आहात आणि त्या वायफाय ला जे डिवाइस कनेक्टेड आहेत त्यांना पण ते सुरक्षित ठेवत असतात. नक्कीच जर त्या वायफाय साठी याचा वापर केला असेल तर. काही असे मॅलवेअर आहेत जे वायफाय च्या मदतीने पसरत असतात. 

एवढंच नाही तर तुमच्या नकळंत जर एखादं सॉफ्टवेअर किंवा मॅलवेअर पण म्हणू शकतो जे त्याच्या हॅकरच्या सर्वर शी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण ते रोखण्याचा प्रयत्न करतात. ते अडवतीलच याची खात्री नसते त्यासाठी तुम्हाला अॅंटीवायरस वापरवाच लागेल. 

फायरवॉल काम कसं करतं?

हे आपले द्वारपाल असतात किंवा सोसायटीच्या संदर्भात म्हणलं तर सुरक्षा रक्षक जे आपल्या रक्षणासाठी काम करतात. जे आपल्या घरात त्यांनाच पाठवतात ज्यांना आपण ओळखतो आणि तो ओळखतो आणि जर एखादा अनोळखी असेल तर त्याला तो अडवतो किंवा आपल्या सांगण्यावरूनच त्याला तो आत पाठवेल. 

अशाच प्रकारे आपल्या लॅपटॉपमध्ये काही पोर्ट्स असतात ज्यातून आपलं ट्रॅफिक येत जात असतं. ज्यात तो फक्त विश्वसनीय सोर्सेस, आयपी अॅड्रेस ना परवानगी देतो किंवा अडवतो. हे सगळं काम तो एकानियमावलीच्या आधारावर करतो. हे नियम आयपी अॅड्रेस, डोमेन नेम, पोर्ट्स, प्रोटोकॉल्स, प्रोग्राम्स किंवा शब्द यांच्यावर आधारित असू शकतात. 

फायरवॉल काय करू शकतं?

मॅलवेअर सुरक्षा

हे काय अॅंटीमॅलवेर टूल तर नाही पण हे काही धोक्यांपासून तर नक्कीच वाचवू शकतात. बॅकग्राऊंड मध्ये खूप apps चालू असतात त्या जर तुमच्या कॉम्प्युटर मध्ये मॅलवेअर डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असतील तर यापासून वाचू शकता. हा रक्षक ते कनेक्शन थांबवतं. 

Restrict Access

जर हॅकर तुमच्या आयपी अॅड्रेस चा वापर करून तुमच्या कॉम्प्युटर चा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर यापासून पण ते वाचवतं. म्हणून हा टूल कधीच बंद करू नका. 

डेटा सुरक्षा

तुमचं जर फायरवॉल बंद असेल आणि तुम्ही कनेक्टेड असलेलं नेटवर्क धोकादायक असेल तर तुमची खाजगी आणि महत्वाची माहिती चोरली जाऊ शकते किंवा डिलीट पण केली जाऊ शकते. किंवा त्या माहितीच्या आधारे तुम्हाला ब्लॅकमेल पण केलं जाऊ शकतं. 

प्रकार  

आपल्या गरजेनुसार यांचे तीन प्रकार पडतात. सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि क्लाऊड 

सॉफ्टवेअर

नावानुसारच तुम्ही याला तुमच्या विंडोज, अँन्ड्रॉईड, ios, लिनक्स आणि मॅक os वर पण इंस्टॉल करू शकता. हे सॉफ्टवेअर फक्त एका डिवाइस लाच सुरक्षित ठेऊ शकतात. हा प्रकार एखाद्या व्यक्तीसाठी चांगला आहे पण ज्याचा व्यवसाय आहे ज्याच्या ऑफिसमध्ये काम प्रामुख्याने कॉम्प्युटरवर होतं त्यांच्यासाठी हे अजिबात उपयुक्त नाही. शिवाय प्रत्येक कॉम्प्युटरवर हे इंस्टॉल करण आणि त्याला हातळणं ही शक्य नाही. त्यामुळे सॉफ्टवेअर फायरवॉल ही एका व्यक्तीसाठी किंवा डिवाइससाठी खूप उपयोगी आहे. 

हार्डवेअर

याचा वापर एका संपूर्ण वायफाय नेटवर्कला सुरक्षित करण्यासाठी केला जातो. याच्या मदतीने एकाच वेळी जास्त डिवाइसवर लक्ष ठेवता येतं. याचा उपयोग जे व्यावसायिक आहेत त्यांना खूप जास्त होतो. शिवाय हा वेगळा डिवाइस येत असल्याने आपल्या कॉम्प्युटरची ऊर्जा पण वाचते. त्यामुळे हे जास्त लोकांसाठी खूप उपयोगी आहे. 

क्लाऊड फायरवॉल

हे क्लाऊड सर्व्हर चा वापर करतात. यांना प्रॉक्सी फायरवॉल असंही म्हटलं जातं. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे मानवी चुकांमुळे बंद पडणार नाही. म्हणजे एखाद्याच्या चुकीमुळे हार्डवेअर खराब होऊ शकतं. सॉफ्टवेअर चुकून डिलीट होईल, किंवा काहीतरी सेटिंग आपल्यामुळे बदलणे या घटना घडू शकतात. पण क्लाऊड च्या संदर्भात हे जवळपास अशक्य आहे. तुमच्या ऑफिसमध्ये काहीही होऊ दे ते आपलं काम करत राहील. त्यामुळे ऑफिसमध्ये हार्डवेअर फायरवॉल ऐवजी क्लाऊड चा हा प्रकार वापरणं चांगलं राहील. 

फायरवॉल vs व्हीपीएन

फायरवाल लोगो -सायबर बंधू

VS

व्हीपीएन -सायबर बंधू

फक्त फायरवॉल वापरल्याने तुम्ही पूर्णपणे सुरक्षित होत नाहीत. हे तुमच्या ट्रॅफिकवर लक्ष ठेवतं चुकीच्या सर्व्हरशी तुम्हाला कनेक्ट करू देत नाही. आणि व्हीपीएन तुमची माहिती एनक्रिप्ट करतं. 

उदा. आधीचंच घेऊ तुमच्या दारात बसलेला सुरक्षा रक्षक हा फायरवॉल समजा तो तुम्हाला येताना जाताना बघतो, तुम्ही चुकीची वस्तु सोबत आणली किंवा चुकीच्या ठिकाणी जाणार असाल तर तो तुम्हाला अडवतो. हे काम फायरवॉल करतो. पण समजा आता त्या सुरक्षा रक्षकासोबत त्याचे काही मित्र किंवा अनोळखी माणसं असतील आणि त्यांच्या नकळत तुम्हाला जायचं असेल तुमच्याकडे वेषांतर किंवा गाडीत लपून जाणे तेही गाडीची नंबर प्लेट (आयपी अॅड्रेस) बदलून जाणं हा एक पर्याय आहे. हाच पर्याय व्हीपीएन आहे. जे तुम्हाला कुणाच्याही नजरेत न पडू देता ये जा करू देऊ शकत, तेही तुमची माहिती एनक्रिप्ट करून.

त्यामुळे जास्त सुरक्षेसाठी दोन्हीचा वापर करणं आवश्यक आहे. 

फायरवॉल सुरक्षा टिप्स 

  • तुमच्या लॅपटॉप/ कॉम्प्युटर मधील फायरवॉल नेहमी चालू ठेवा. चालू केलेलं नसे तर त्याला चालू करा. 
  • फायरवॉल नेहमी अपडेट करत चला. जर ही टाळलं तर खूप महागात पडू शकतं. 
  • फक्त फायरवॉल वर अवलंबून राहू शकत नाही. अधिक सुरक्षेसाठी चांगल्या vpn चा वापर करा. 
  • कधी कधी फायरवॉल ही ठरवू शकत नाही की एखाद्या कनेक्शन ला परवानगी द्यावी की नाही त्यावेळी तो तुम्हाला विचारतो म्हणून अनोळखी कनेक्शनला कधीच परवानगी देऊ नका. 
  • जरी तुम्ही याचा वापर असाल तरी तुमच्या डिवाइस मध्ये एक अॅंटीवायरस सॉफ्टवेअर असलंच पाहिजे. 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *