फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
सध्याचं इंटरनेट जर तुम्हाला खूप सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही खूपच साधे भोळे आहात. कारण जिथं इंटरनेटवर गूगल, फेसबूक आहेत तिथे तुम्ही काय करत आहात यावर ते डोळा ठेऊनच आहेत. फेसबूक तर इतर वेबसाइटकडून तुमची माहिती विकत घेत असतोच आणि मग तुम्हाला त्या माहितीच्या आधारावर ads दाखवतो.
या सर्व गोष्टींपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर मग तुम्ही खालील गोष्टी करा. याने तुम्हाला खूप फायदा होईल. खरं तर ads दाखवणं काही चुकीचं नाही कारण फुकट मध्ये सर्व गोष्टी देणं त्यांना पण शक्य होणार नाही. पण सध्या स्कॅमर्स पण या ads चालवतात जे मुळात धोकादायक आहे. त्यामुळे यापासून वाचलं पाहिजे.
मुद्दे
ब्राऊजर
इंटरनेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला ब्राऊजर खूप आवश्यक आहे. त्यातही एखादा चांगला ब्राऊजर वापरणं ही महत्त्वाची बाब आहे. सध्या सगळ्याच ब्राऊजर मध्ये सारखेच फीचर्स पाहायला मिळतात. फक्त काहीच ब्राऊजर आहेत जे आपल्या प्रायवसी वर लक्ष देतात. तुम्हाला जर असे ब्राऊजर माहीत नसतील तर तुम्ही खालील ब्राऊजरचा वापर करू शकता.
फायरफॉक्स
खूप लोकं सध्या फायरफॉक्स ब्राऊजरचा वापर करतात. हा ब्राऊजर सोडला तर इतर सर्व ब्राऊजर ही क्रोमियम या कोडवर आधारित आहेत. जो गूगलने बनवला आहे. पण हा ब्राऊजर वेगळ्या कोड ने तयार केलेला आहे. आणि open source पण आहे.
म्हणजे तुम्हाला जर याचा कोड पाहायचा असेल तर तुम्ही बघू शकता. यात तुम्हाला बरेच प्लगइन पण मिळतील. आणि आता तर यांच्या मोबाईल मधील ब्राऊजर मध्ये पण प्लगइन वापरता येतात. शिवाय हा ब्राऊजर स्वतः पण काही ट्रॅकर आणि ads ब्लॉक करतो.
नॉर्टन
ही कंपनी अॅंटीवायरस च्या दुनियेत खूप प्रसिद्ध आहे. त्यांचा स्वतःचा एक ब्राऊजर आहे. ज्यात डिफॉल्ट सर्च इंजिन ही त्यांचंच norton safe search नावाचं आहे. ही जे ब्राऊजर आहे ते क्रोमियम वर आधारित आहे.
त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कुठे पण क्रोमला अपडेट करा अशी बातमी वाचाल किंवा ऐकाल तेव्हा हा पण ब्राऊजर अपडेट करा. हा ब्राऊजर ads पण ब्लॉक करतो आणि पॉप अप्स पण ब्लॉक करत असतो.
अवास्ट
पहिलं मी इथे लिहिलं होतं की अवास्ट ब्राऊजर चा वापर करू शकता पण २३ फेब्रुवारी २०२४ ला मिळालेल्या माहिती नुसार ही कंपनी त्यांच्या ग्राहकांची माहिती ब्राऊजर आणि एक्सटेन्शन च्या माध्यमाने गोळा करत होती आणि ती इतर कंपन्यांना विकायची त्यामुळे या कंपनीले १६.५ दशलक्ष डॉलरचा दंड पण ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता ही कंपनी विश्वसनीय राहिली नाही.
डक डक गो
यात डक डक गो हे सर्च इंजिन मिळतं. हे ब्राऊजर मोबाईल, विंडोज, मॅक साठी उपलब्ध आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. याच्या मोबाईल ब्राऊजर मध्ये एक फीचर मिळतं, ज्यात तो इतर apps चे ट्रॅकर्स ब्लॉक करतो. जी एक चांगली गोष्ट आहे.
टॉर
हा ब्राऊजर प्रायवसी बाबतीत सगळ्यांचा बाप आहे. कारण यातून तुमचं कनेक्शन कमीत कमी तीन वेगवेगळ्या सर्व्हरमधून जातं. यामुळे ही खूपच स्लो काम करतं.
सर्च इंजिन
सर्च इंजिनचं काम तुम्हाला इंटरनेटवरील वेबसाइट आणि इतर माहिती आणून देण्याचं असतं. ती माहिती बघण्यासाठी तुम्हाला ब्राऊजरची गरज असते. पण सध्या गूगल सगळ्यात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे. आणि पैसा कमावण्यासाठी गूगल आपली माहिती कामात घेतं. या व्यतिरिक्त पण इतर खूप सर्च इंजिन आहेत. जे आपल्या गोपणीयतेअर भर देतात.
नॉर्टन सेफ सर्च, डक डक गो, स्टार्टपेज, braveही काही सर्च इंजिन आहेत जे ads दाखवतात पण ते आपल्याशी निगडीत नसतात. म्हणजे आपल्या माहितीचा वापर करून ते आपल्याला ads दाखवत नाहीत. पण यावरील रिजल्ट कदाचित तुम्हाला चांगले वाटणार नाहीत कारण आपल्याला गूगलची खूप जास्त सवय लागली आहे.
Browser Settings
पहिली गोष्ट तुमचं ब्राऊजर ही नेहमी अपडेट असलं पाहिजे आणि क्रोम किंवा क्रोमियम वर आधारित असेल तर ते नेहमीच अपडेट करत रहा. तुम्ही जर क्रोम किंवा क्रोमियमवर आधारित ब्राऊजर वापरत असाल तर खालील सेटिंग करून घ्या.
settings> privacy and security> safe browsing> enhanced



settings> privacy and security>3rd party cookies> block


settings> privacy and security> send do not track request


settings> privacy and security> always use secure connection


settings> privacy and security> dns> तुमच्या मर्जीने कोणताही वापरा पण वापरा


इतर ब्राऊजर मध्ये पण या सेटिंग्स तुम्हाला मिळून जातील.
Https
कोणत्याही वेबसाइटला भेट देत असला तर त्याच्या url ची सुरुवात ही https ने किंवा तुम्हाला तिथे कुलूपाचं चिन्ह दिसेल ते असेल तरच तुमची कसलीही माहिती त्या वेबसाइट मध्ये भरा. नाही तर भरू नका.

या s मुळे तुमची माहिती सुरक्षितपणे सर्व्हरपर्यंत पोहोचते. ही एनक्रिप्ट होते ते या एका s मुळे. हे s एका ssl सर्टिफिकेट मुळे येतं. हे जर नसेल तर मग हॅकर टी माहिती सर्व्हरपर्यंत पोहोचायच्या आधी मध्येच टी वाचू शकतो. याने त्यांना डेटाबेस हॅक करावा लागणार नाही. कारण हे सोपं पडतं.
या भ्रमात राहू नका की जर s असेल तर वेबसाइट सुरक्षित आहे. या s चा अर्थ एवढाच आहे की तुम्ही भरलेली माहिती सर्व्हर पर्यंत सुरक्षित पोहोचेल. जर वेबसाइट हॅकर चालवत असेल तर मग ती मुळीच सुरक्षित नाही.
वेबसाइट तपासा
सध्या कोणती वेबसाइट धोकादायक असेल ओळखणं अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला इतर टूल्सची मदत घ्यावी लागेल. यासाठी इंटरनेटवर काही वेबसाइट सुरक्षित आहे की नाही यासाठी काही टूल्स आहेत याचा तुम्ही वापर करू शकता.
https://www.virustotal.com/gui/home/upload
एक्सटेन्शन
जर तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप जात प्रमाणात वापरत असाल तर एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे काही एक्सटेन्शन वापरायला मिळतात. ज्याच्या मदतीने तुम्हाला तिथेच कळेल की एखादी वेबसाइट सुरक्षित आहे की नाही ही कळेल. जेवढे जास्त एक्सटेन्शन वापराल तेवढी सुरक्षा तर मिळेलच पण सोबत ब्राऊजर पण जरा स्लो होऊ शकतो.
ब्लॉक Ad
सगळेच ads तुमच्यासाठी घातक असतात असं नाही. कारण काही ads हे स्कॅमर्स किंवा हॅकर्स चालवत असतात जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यासाठी तुम्ही ad blockers वापरू शकता.
पॉप अप्स
जर एखाद्या वेबसाइटवर जास्तच पॉप अप्स येत असतील तर त्या वेबसाइटवर परत जाऊ नका. कारण ती वेबसाइट एक तर हॅक झाली असेल किंवा ती स्वतः हॅकर चालवत असेल.
खास करून जर पॉप अप्स मध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये वायरस घुसला आहे सांगत आहे किंवा एखादं व्हीपीएन किंवा अॅंटीवायरस डाउनलोड करायला सांगत जे की वेगळीच कंपनी आहे तर त्या वेबसाइटला परत भेट देऊ नका.
अशा apps पण अजिबात डाउनलोड करायच्या नाही. याने तुमचा डिवाइस हॅक होऊ शकतो. याला स्केअरवेअर असं म्हणतात.
व्हीपीएन
व्हीपीएन ने तुम्हाला ट्रॅक केलं जाऊ शकत नाही. यात फक्त एवढीच की vpn चांगल्या कंपनीचा असावा. नाहीतर तो तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
DNS
याची आधीच एक सेटिंग संगितली आहे ब्राऊजरसाठी टी करा याने तुम्ही dns spoofing सारख्या अटॅक पासून सुरक्षित राहाल.
पासवर्ड मॅनेजर
ब्राऊजर मधील पासवर्ड मॅनेजर वापरणं कदाचित थोडं धोकादायक आहे. कारण त्याची जी decryption key असते ती guess करता येईल अशा ठिकाणी असते त्यामुळे जर हॅकरने ब्राऊजर हॅक केला तर तुमचे पासवर्ड पण लीक होतील.
अॅंटीवायरस
लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ब्राऊजरसाठी तर एक्सटेन्शन आहेत पण जर मोबाईल वर तुम्हाला सुरक्षितपणे ब्राऊजर वापरायचं असेल तर मग एखादं चांगलं अॅंटीवायरस वापरणं आवश्यक आहे. त्यांच्यात ब्राऊजर प्रोटेक्षण ची सुविधा असते.
काही अॅंटीवायरस हे फक्त मोजक्या ब्राऊजरलाच सुरक्षित ठेऊ शकतात. जसं क्विक हिल हा फक्त क्रोम ला सुरक्षित ठेऊ शकतो बाकी दुसऱ्या ब्राऊजर ला नाही त्यामुळे तुम्हाला सुरक्षित इंटरनेट वापरायचं असेल तर मग फक्त क्रोम वापरावा लागेल. तुम्ही दुसरे ब्राऊजर पण वापरू शकता तुमची मर्जी.
फायरवॉल
हा तुमच्या डिवाइस मधील येणाऱ्या जाणाऱ्या इंटेनेट ट्रॅफिक वर लक्ष ठेवत असतो. त्यामुळे एक चांगला अॅंटीवायरस ही सुविधा तर देतोच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक फ्री फायरवॉल सॉफ्टवेअर वापरा.
Leave a Reply