फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
जे इंटरनेटवर तुम्ही वापरताय ते खूप साधं भोळं आणि सात्विक इंटरनेट आहे. या इंटेरनेटचे पण वेगवेगळे भाग आहेत. ज्यांचा वापर वेगवेगळ्या कामासाठी होतो. त्यात तीन प्रकार येतात. पहिला सर्फेस वेब दुसरा डीप वेब आणि तिसरा डार्क वेब. पहिल्या दोनचा वापर तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात रोजच करता. तिसरा प्रकार हा थोडा भयानक होऊ शकतो. त्याचा वापर तुम्ही कसा करणार आहात किंवा करताय यावर हे अवलंबून आहे. तर चला सांगतो डार्क वेब नक्की काय भानगड आहे.
मुद्दे
सर्फेस वेब म्हणजे काय?
तुम्ही रोज जे गूगल वापरताय ना ते सर्फेस वेब आहे. मुळात जे गूगल वर शोधल्यावर तुम्हाला मिळतं ते सर्फेस वेब आहे. बातम्या, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर या सर्व गोष्टी तुम्हाला गूगलवर मिळतील. हेच सर्फेस वेब आहे. जिथे तुम्हाला हवी ती माहिती मिळेल आणि बऱ्याच जणांना तुमची माहिती पण मिळेल. तेही तुमच्या नकळत. जी माहिती गूगल सारखे साधारण सर्च इंजिन इंडेक्स करतो ते सर्फेस वेब आहे.
डीप वेब म्हणजे काय?
इंटरनेटचा असा भाग जो तुमच्या पासून लपवला जातो आणि ज्याला तुम्ही वापरू पण शकता. या भागातील माहिती तुम्हाला शोधून मिळणार नाही. जसं की तुम्ही जे जीमेल त्यातील ईमेल फक्त तुम्हालाच दिसतात जर एखाद्यानं सर्च केलं की अमुक अमुक जीमेलवर आलेला ईमेल दाखवा तरी त्याला मिळणार नाही. ही माहिती फक्त डीप वेब मध्ये असते.
सर्व कंपनीचे डेटाबेस, तुमचे ईमेल संवाद, फेसबूक चॅट, ट्वीटर चॅट, दवाखान्यांमधील रुग्णांची माहिती एखादी अशी माहिती जी पैसे दिल्यानंतरच आपल्याला वाचता येईल किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड माहिती. या सर्व गोष्टी डीप वेब मध्ये येतात. ही माहिती गूगल किंवा इतर कोणताही सर्च इंजिन इंडेक्स करत नाही. करत नाही म्हणजे काय कंपन्या करू देत नाहीत.
या डीप वेब मध्ये सर्फेस वेब पेक्षा शेकडो पटीने जास्त माहिती साठवली आहे. याचं एक उदाहरण म्हणजे तुम्ही सध्या जी माहिती वाचताय ती सर्फेस वेब आहे आणि जिथून ही माहिती तुमच्यापर्यंत (डेटाबेस) आली आहे ती डीप वेब आहे. कधी याचा विचार केलाय का या डीप वेब मध्ये किती प्रमाणात माहिती आहे? डीप वेब मध्ये ७५०० TB ची माहिती आहे आणि सर्फेस वेब मध्ये फक्त १९ TB ची माहिती आहे. आणि हा आकडा वाढतच जाणार आहे. सांगायचं झालं तर डीप वेब पूर्ण इंटरनेटचा ९०-९५ टक्के भागीदार आहे.
डार्क वेब म्हणजे काय?
डार्क वेब हा डीप वेबपेक्षा खूप लहान आहे. यावरील माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर ती साध्या ब्राऊजर मार्फत तुम्ही पाहू शकणार नाही. जसं गूगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एड्ज, मोझिल्ला फायरफॉक्स, ओपेरा, vivaldi यांच्या मदतीने तर तुम्ही डार्क वेब वापरू शकणार नाही. यासाठी वेगळा ब्राऊजर आहे जो तुम्हाला आणि तुमच्या माहितीला पण सुरक्षित ठेवेल.
- बॉटनेट म्हणजे काय?
- मॅलवेअर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
- पासकीज म्हणजे काय?
- फ्री डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स
- सायबर सुरक्षा म्हणजे काय?
डार्क वेब वर जे काही घडतं हे सगळं लपून होतं म्हणजे तुम्ही जर गूगल क्रोम वापरत असाल त्यात पण गूगल सर्च इंजिन वापरत असाल तर तुम्ही कोण आहात, कोणत्या मोबाईलवरून सर्च करताय, काय सर्च करताय, कुठून सर्च करताय या सर्व गोष्टी कळतात. पण डार्क वेब वर यातली एक पण गोष्ट कळणार नाही पण त्यासाठी तुम्हाला काही सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
सर्फेस वेब | डीप वेब | डार्क वेब |
---|---|---|
सोशल मीडिया | दवाखान्यातील रुग्णाच्या नोंदी | अनधिकृत माहिती |
बातम्यांचे वेबसाइट | कंपनीचे डेटाबेस | हत्यारांची देवाणघेवाण |
ब्लॉग | आपले मेल | गुपीत माहिती |
एका अभ्यासानुसार डार्क वेब वर जवळपास २७०० वेबसाइट आहेत. त्यापैकी अंदाजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त वेबसाइटवर बेकायदेशीर गोष्टी चालतात. पण डार्क वेब वर काही चांगल्या वेबसाइट पण आहेत.
तुम्ही गूगलच्या मदतीने डार्क वेब वरील गोष्टी पाहू शकणार नाहीत. त्यासाठी वेगळे सर्च इंजिन आहे. जसे कॅन्डल, नॉट एव्हील किंवा स्पेअरएक्स इत्यादी असे वेगळे सर्च इंजिन आहेत. त्यांना पण वापरण्यासाठी वेगळा ब्राऊजर वापरावा लागेल.
डार्क वेब वर कुणीच आपली ओळख दाखवत नाही. वाप्रकर्ते पण नाही आणि वेबसाइटचे मालक पण नाही त्यामुळे ज्या बेकायदेशीर वेबसाइट आहेत त्यांना बंद करणं जरा अवघड होतं. आणि सोबतच या गोपणीयतेमुळे डार्क वेब वरील वेबसाइटवर एखादा देश बंधन पण घालू शकत नाही.
काय करावे | काय करू नये |
---|---|
आधी स्वतः याबाबत सगळी माहिती मिळवा | बेकायदेशीर गोष्टींमध्ये अडकू नका |
सुरक्षित टूल्स चा वापर करा | कसल्याही फाइल डाउनलोड करू नका |
सॉफ्टवेअर अपडेटेड वापरा | कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका |
url ची तपासणी करूनच त्यावर जा | कुठेही आपली खाजगी माहिती देऊ नका |
स्वतः ची खाजगी माहिती सुरक्षित ठेवा | कोणावर पण विश्वास ठेऊ नका |
क्रीप्टोकरंसी चा वापर करा जर काही खरेदी करणार असाल तर | सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका |
ऑनलाइन चॅट करताना सावध रहा | कायद्याचं उल्लंघन करू नका |
वेबकॅम चालू ठेऊ नका किंवा त्याला बंद करता ये असेल तर करा. | पब्लिक फोरम वर खाजगी माहिती देऊ नका. |
डार्क वेब वापरण्याचे फायदे काय?
डार्क वेब वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा गोपणीयतेसाठी आहे. याचा जन्म पण यासाठीच झाला होता. एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ७०.९ टक्के लोकं स्वतःच्या प्रायवसीसाठी टॉर ब्राऊजरचा वापर करतात. ६२.२८ टक्के वापरकर्ते सुरक्षेसाठी तर २७.०७ टक्के ही फक्त उत्सुकतेपोटी डार्क वेब वापरतात.
जसं की इंटेरनेटच्या या भागात कोणालाही ट्रॅक करणं जवळपास अशक्य आहे त्यामुळे काही जणं यावरच संवाद साधतात याच्या प्रायवसी आणि सुरक्षेमुळे.
याचा उपयोग चांगल्या कामासाठी पण होतो.
- काही पत्रकार लोकं डार्क वेबच्या मदतीने सरकारी कार्यालयात आणि संस्थानात चालणारे घोटाळे लोकांसमोर उघडकीस आणतात.
- नागरिक किंवा सरकारी अधिकारी सरकार बाबतीतच्या बातम्या वाचण्यासाठी याचा वापर करतात ज्या सर्च इंजिनद्वारे ब्लॉक केल्या गेल्या असतील.
- काही आंदोलनकर्ते डार्क वेबच्या सहाय्याने प्रायवसी राखून सरकार विरोधात रोष व्यक्त करतात.
- काहीजण स्वतःची वैद्यकीय माहिती उघड न होण्यासाठी याच्या सहाय्याने वैद्यकीय सल्ला मिळवतात.
- सरकार कडून प्रतिबंध लावलेल्या वेबसाइट किंवा Geo Blocked Content वापरण्यासाठी
- एकही जाहिरात न पाहता सर्च करण्यासाठी
- cryptocurrency वॉलेट सुरक्षित ठेवण्यासाठी
- सरकारच्या नजरेत न पडता सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी.
डार्क वेब वापरण्याचे तोटे किंवा धोके
- डार्क वेबवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोष्टी घडत असतात. त्यावरील वेबसाइट या गुन्हेगारांमार्फत पण चालवल्या जात असतील याची शक्यता नाकारता येणार नाही. या वेबसाइटवर बेकायदेशीर देवाणघेवाण होत असते. आणि जर अशा वेबसाइटला तुम्ही भेट दिली तर याची शक्यता नाकारता येणार नाही की कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते तुमची माहिती चोरण्याचा पण प्रयत्न करू शकतात.
- डार्क वेब वर कोणती लिंक चांगली असेल हे कधीच सांगता येणार नाही. एखाद्या लिंक वर क्लिक केलात तर तुम्हाला असे काही विडियो पण पाहायला मिळतील जे तुम्हाला विचलित करू शकतात. किंवा तिथून जर एखादी फाइल पण डाउनलोड केली तर टी पण सुरक्षित असेल की नाही याची खात्री नाही. त्यात वायरस पण असू शकतो.
- ज्याप्रकारे तुम्ही याचा वापर करता तसंच सरकारी यंत्रणा पण याचा वापर करत असतात. जे कोणी पण बेकायदेशीर लोकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात किंवा बेकायदेशीर गोष्टी करतात त्यांचा शोध घेत असतात आणि मग त्यांना अटक पण करतात. तुमच्या चुकीमुळे तुम्ही पकडला पण जाल किंवा फसू पण शकतात.
- डार्क वेब वर Quora आणि Reddit सारखे forums पण असतात. ज्यावर हॅकर्सशी संपर्क साधू शकता. त्यांना एखादं काम पण देऊ शकता. मॅलवेअर्स विकत घेऊ शकता. ते हॅकर्स तुमचा डिवाइस पण हॅक करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांना काही घेणं देणं नसतं. तुमची माहिती त्यांचा खजिना आहे.
- एखादी वेबसाइट तुमच्या डिवाइसमध्ये remote administration tool ज्याला RAT असंही म्हणतात हे इंस्टॉल करू शकतात किंवा तुमचा वेबकॅम पण हॅक करू शकतात.
- एक उदाहरण घ्या तुम्ही जाहिरात पाहता की जिथे तुम्हाला खूप स्वस्तात कपडे मिळायलेत तुम्ही त्या वेबसाइट वर जाऊन खरेदी करता ज्यात कॅश ऑन डिलीव्हरी चा पर्याय नसतो पण लोभापायी तुम्ही ते खरेदी करता आणि तुम्हाला एक तर ते कपडेच मिळत नाहीत किंवा वेगळंच काहीतरी मिळतं आणि ती वेबसाइट तुम्ही याआधी कधी पाहिलेली पण नसते.
- अशा घटना डार्क वेब वर पण घडत असतात. यावर ड्रग्स, बंदुका पण विकले जातात त्यामुळे खूप लोकं ही विकत घेण्यासाठी याचा वापर करतात आणि कित्येक जाण यात फसले पण आहेत. त्यांना ड्रग्स च्या जागी ग्लुकोजच्या पुड्या पाठवल्या गेल्या आहेत.
- अशा वेळी काही माहिती पण त्यांच्या कडे जाते जसं पत्ता, फोन क्रमांक वगैरे. ज्या पद्धतीने पैसे दिले जसं क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी. ते पण त्यांच्याजवळ गेलं. पण सध्या याच्यावर सगळे व्यवहार ही बिटकॉईन किंवा इतर क्रीप्टोकरंसी च्या माध्यमातूनच होतात. ज्यांना ट्रॅक करणं अशक्य आहे.
- तुम्ही पुढे वाचाल की मी आधी पण खूपदा सांगितलं की डार्क वेब खूप सुरक्षित आणि गोपनीय आहे. ही वाचून जर तुम्ही बिनधास्तपणे डार्क वेब वापरला तर कदाचित याचा फटका तुम्हाला बसू शकतो. यात तुम्हाला मानसिक त्रास पण होऊ शकतो. ही सर्व तुमच्या निष्काळजीपणामुळे आणि एका चुकीमुळे घडू शकतं.
- इथे असे पण काही फोरम असतील ज्यात अतिरेक्यांचा शिरकाव असेल. याचा वापर ते भडकाऊ भाषणं देण्यासाठी, दहशतवाद पसरवण्यासाठी पण करतात.
डार्क वेब बेकायदेशीर आहे का?
याचं उत्तर अंशतः नाही म्हणेन. डार्क वेब वापरणं बेकायदेशीर नाही. सरकारी यंत्रणा, पत्रकार आणि इतर लोकं याचा वापर करत असतातच. पण यावरील कोणती लिंक कोणत्या प्रकारच्या वेबसाइटवर नेईल हे सांगता येत नाही.
त्यामुळे जर तुम्ही चुकून अशा वेबसाइटवर गेलात जिथे बेकायदेशीर गोष्टी घडतात तर ते तुम्हाला अडचणीत आणू शकतात. आणि जर बेकायदेशीर गोष्टी करण्यासाठीच जर याचा वापर करत असाल तर मग तो तर कायद्याने गुन्हा आहेच.
जरी तुम्हाला डार्क वेब वापरायचा असेलच तर तुम्ही खालील गोष्टींचा आणि सूचनांचा वापर करा. आणि स्वतः च्या रिस्कवर याचा वापर करा. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकेल. त्यामुळे सावधान!
डार्क वेब कसा वापरावा? सुरक्षितरित्या!
पुढील सर्व माहिती ही फक्त शैक्षणिक कारणांसाठी आहे. याचा वापर तुम्ही तुमच्या मर्जीने कसाही करावा.
टॉर ब्राऊजर
ही सगळ्यात जास्त प्रसिद्ध पद्धत आहे. याव्यतिरिक्त पण अजून पद्धत आहेत पण सध्या ही प्रसिद्ध असल्याने याबाबतीतच सांगतो.
Tor चा फूल फॉर्म The Onion Router असा आहे. जर तुम्ही याच्या मदतीने सर्फेस वेब वापरत असाल तर तुमची माहिती पण खूप सुरक्षित आणि गोपनीय राहील.
जेव्हा पण तुम्ही टॉरशी कनेक्ट करता तेव्हा तुमचं इंटरनेट कनेक्शन ही कमीत कमी तीन सर्व्हर मधून जातं. प्रत्येक सर्व्हर मध्ये तुमची माहिती एनक्रिप्ट होत असते.
ज्या पण पहिल्या सर्व्हरला तुमचा आयपी अॅड्रेस कनेक्ट होते त्याला तुमचा आयपी अॅड्रेस माहीत असतो. पण तुम्ही इंटरनेट वर काय करत असतात याबाबतीत त्याला अजिबात माहीत नसतं.
शेवटच्या सर्व्हर वर जी पण माहिती पोहोचते ती तिथे डिक्रिप्ट केली जाते आणि परत एनक्रिप्ट केली जाते त्यामुळे शेवटच्या सर्व्हरला तुम्ही कोणत्या वेबसाइटला भेट देताय ही सगळं त्याला माहीत असतं फक्त तुमचं आयपी अॅड्रेस त्याला माहीत नसतो.
जरी टॉरच्या माध्यमाने तुम्ही उच्च कोटीची सुरक्षा आणि गोपनीयता मिळवू शकत असाल तरी पण याची नाजुक बाजू म्हणजे याचं शेवटचं सर्व्हर आहे. ही अवघड जागेचं दुखणं बनतं. जरी ही तुमचा आयपी अॅड्रेस बघू शकत नाही पण तुमची इतर डिक्रिप्टेड माहिती हा वाचू शकतो.
याची अजून एक कमतरता म्हणजे जर एखाद्या सरकारी यंत्रेणेनं यांच्या सर्व्हर्स वर ताबा मिळवला तर हे तुम्हाला शोधून काढू शकतात. ते वेळेचा वापर करतात यात तुम्ही कोणत्या वेळेला टॉर नेटवर्कशी कधी कनेक्ट झालात आणि शेवटच्या सर्व्हरशी कधी कनेक्ट झालात ही बघतात. कारण आयपी अॅड्रेस शिवाय इतर सर्व माहिती या सर्व्हरवर असते.
या टॉर नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी तुम्ही टॉर ब्राऊजरचा वापर करू शकता. ही ब्राऊजर अमेरिकेच्या नौदलाने तयार केलं होतं. नंतर २००४ मध्ये इतर सर्वांसाठी ते खुलं करण्यात आलं होतं. तुम्हाला प्ले स्टोअरवर हे app मिळून जाईल. लॅपटॉपसाठी किंवा डेस्कटॉपसाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन याला डाउनलोड करू शकता.
याचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर खूप संयम बाळगावा लागेल. कारण तुमचं कनेक्शन ही कमीत कमी तीन सर्व्हरमधून जातं आणि प्रत्येक वेळी एनक्रिप्ट पण होतं त्यामुळे ही खूप स्लो होतं. ४० mbps ची जरी स्पीड तुमच्याकडे असेल तरी ते खूपच कमी स्लो चालतं. त्यामुळे साध्या ४G नेटवर्क वर चालवणं म्हणजे गोगलगाय वर बसून जाण्यासारखं आहे.
व्हीपीएनचा वापर
जसं की वर टॉर कनेक्शन बद्दल सांगताना मी सांगितलं तुमचा आयपी अॅड्रेस हा पहिल्या सर्व्हरला माहीत असतोच त्यामुळे ही धोकादायक ठरतं. यासाठी तुम्ही चांगल्या व्हीपीएनचा वापर करणं गरजेचं आहे.
उगाच प्ले स्टोअर वर मिळणारं कुठलंही फुकट व्हीपीएन वापरू नका. जे व्हीपीएन माहीत असेल की ही चांगलं आहे त्याचाच वापर करा त्याच्या पॉलिसी मध्ये नो लॉग्स पॉलिसी चा समावेश असला पाहिजे.
जेणेकरून तुमची कसलीही माहिती तो व्हीपीएन साठवून ठेवणार नाही. जर असे व्हीपीएन माहिती नसतील तर खरेदी करा तेही चांगल्या आणि नामांकित कंपन्यांचे.
डार्क वेब सर्च इंजिन
गूगल, मायक्रोसॉफ्टचं बिंग, याहू, यांडेक्स (रशियाचं), बैडू यांसारखे सर्च इंजिन डार्क वेब वरील वेबसाइट दाखवत नाहीत यासाठी तुम्हाला वेगळेच सर्च इंजिन वापरावे लागतील.
डक डक गो
हे सर्च इंजिन टॉर ब्राऊजर मधील डिफॉल्ट सर्च इंजिन आहे. ही सर्च इंजिन याच्या प्रायवसीसाठी अक्ख्या पंचकृषीत प्रसिद्ध आहे. ही सर्च इंजिन यूजरला ट्रॅक करत नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर डार्क वेब वापरण्यासाठी करू शकता.
टॉर्च
हे सर्च इंजिन पण यूजरला ट्रॅक करत नाही आणि हे सर्च इंजिन पण डार्क वेब वरील सर्वात जुनं सर्च इंजिन आहे.
Ahmia.fi
तुम्ही क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट एड्ज चा वापर करून डार्क वेबवरील वेबसाइटच्या लिंक या सर्च इंजिनच्या मदतीने पाहू शकता त्यांना भेट देऊ शकणार नाही. त्यांना उघडण्यासाठी तुम्हाला टॉर ब्राऊजर वापरावं लागेल.
डार्क सर्च
या सर्च इंजिनच्या मते हे डार्क वेब वरील वेबसाइट दर २४ तासांनी इंडेक्स करत असतो.
डार्क वेब वरील वेबसाइट
तुम्हाला आता ही माहीत आहे की डार्क वेब वापरण्यासाठी काय गोष्टी लागतात. यांचा वापर करून तुम्ही डार्क वेब वरील वेबसाइट पाहू शकता. पण तुम्हाला कळणार कसं की वेबसाइट साधी नाही. तर यासाठी तुम्हाला त्याच्या url ला पाहावं लागेल. कारण साध्या वेबसाइटच्या डोमेनचा शेवट हा .com, .in, .gov.in, .org या शब्दांनी होतो.
- https://cyberbandhu.in/
- https://cyberbandhu.in/hindi/
- https://alaukikmarathi.com/
- https://alaukikmarathi.com/hindi/
- https://cybercrime.gov.in
पण डार्क वेब वरील वेबसाइटच्या url चा शेवट हा .onion या शब्दाने होतो. एवढंच नाही तर यांचे url पण खूप विचित्र असतात त्यांना लक्षात ठेवणं खूप अवघड असतं. ही त्यांची उदाहरणं लिंक्स. डार्क वेब वरील वेबसाइट या बदलत असतात. त्या खूपदा बेकायदेशीर कृतींमुळे बंद केल्या जातात किंवा त्यांचे मालक कंटाळतात किंवा नव्या डोमेन चा ते वापर करतात.
- qmifwf762qftydprw2adbg7hs2mkunac5xrz3cb5busaflji3rja5lid.onion
- facebookwkhpilnemxj7asaniu7vnjjbiltxjqhye3mhbshg7kx5tfyd.onion
- https://duckduckgogg42xjoc72x3sjasowoarfbgcmvfimaftt6twagswzczad.onion/
डार्क वेब वर कशाची विक्री होते?
तुम्ही कित्येकदा अशा बातम्या ऐकल्या असतील की अमुक अमुक कंपनी हॅक झाली. खरं तर या कंपनींची डेटाबेस हॅक केली जातात. ज्यात खूप लोकांची माहिती असते. याचा वापर करू ते एक तर कंपन्यांना खंडणी मागतात किंवा परस्पर ती सर्व माहिती डार्क वेब वर स्कॅमर्स किंवा इतर हॅकर्स ला विकतात.
या माहितीत पासपोर्ट, ड्रायविंग लायसेंस, ओळखपत्रं, मोबाईल क्रमांक, बँकशी निगडीत माहिती, सोशल मीडिया यूजरनेम, पासवर्ड ही सर्व माहिती डार्क वेब वर विकली जाते.
डार्क वेबवर बंदूक, मॅलवेअर, कॉम्प्युटर वायरस, ड्रग्स अशा वस्तु पण विकल्या जातात.
इथे तर हॅकर्सला रोजगार पण दिला जातो.
पायरेटेड फाइल पण इथे मिळून जातील जसं सॉफ्टवेअर, पुस्तकं आणि चित्रपटं इत्यादी.
डार्क वेब कुणी तयार केला?
याचा उगम अमेरिकेतच होतो. अमेरिकेतील सरकारने अतिशय गोपनीय पद्धतीने संपर्क साधण्यासाठी याला जन्माला घातलं. याचा वापर लष्करासाठी केला जात होता.
आणि टॉर ब्राऊजरचा वापर डार्क वेब वर जाण्यासाठी केला जायचा. या टॉर ब्राऊजरच्या मदतीने अमेरिकेचे गुप्तहेर जे जगभरात संवाद पसरलेले असायचे ते याच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधायचे.
नंतर अमेरिकेने टॉर सर्वांसाठी खुलं केलं. डार्क वेबचा मुळ उद्देश सुरक्षा आणि गोपनीयता प्रदान करण्याचं होतं. पण याचा दुरुपयोगच मोठ्या प्रमाणात होत आहे. नंतर तर bitcoinच्या शोधाने तर अडचणीतच भर पाडली. कारण त्याआधी क्रेडिट कार्डचा वापर व्हायचा पैसे देण्यासाठी. पण आता अशा cryptocurrency चा वापर होतो ज्यांना ट्रॅक करणं जवळपास अशक्य आहे.
डार्क वेब वरून माहिती कशी काढून टाकायची?
खरं तुम्ही हे करू शकत नाही. यावर जी माहिती टाकली जाते ती हॅकरकडे असते त्यामुळे जारी कुणी ही काढून टाकली तरी तो ती परत टाकू शकतो. तुम्ही फक्त सवाढह होऊ शकता काढून टाकू शकत नाही.
Leave a Reply