बॉटनेट म्हणजे काय? | What is Botnet in Marathi?

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

बॉटनेट हा शब्द robot network या दोन शब्दापासून तयार झाला आहे. बॉटनेट हे अशा कॉम्प्युटर्सचं जाळं असतं ज्याला हॅकर इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही कंट्रोल करू शकतो. याच्या मदतीने तो सायबर हल्ले पण करू शकतो. यांना zombie कॉम्प्युटर पण म्हणतात. एकदा का हा एका कॉम्प्युटर मध्ये घुसला तर तो इतर कॉम्प्युटर ला पण ताब्यात घ्यायला सुरू करतो. अशा प्रकारे ते आपलं एक जाळं तयार करतात. हे सगळं बॅकग्राऊंड मध्ये होत असल्याने यूजरला काहीच कळत नाही. 

बॉटनेट

मोठ्या प्रमाणात हॅकर्सला पैसा कमवायचा असतो म्हणून ते आपलं जाळं पसरवत असतात. या कॉम्प्युटर नेटवर्क च्या मदतीने ते एखाद्या कंपनीवर मोठ्या प्रमाणात हल्ला करतात. यातून मोठी रक्कम पण मिळवली जाते. 

कॉम्प्युटर मध्ये बॉटनेट येतो कसा?

खूप वेगवेगळ्या पद्धतीने बॉटनेट मॅलवेअर तुमच्या कॉम्प्युटर मध्ये घुसू शकतो. 

तुम्हाला एक ईमेल पाठवला जाऊ शकतो. जो की एखाद्या बँककडून, क्रेडिट कार्ड कंपनी इत्यादी अशा कंपनी असल्याचं भासवलं जाऊ शकतं. किंवा तुम्हाला केंद्रित करून पण एक मेल तयार केला जाऊ शकतो. ज्यात तुम्हाला एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जाईल. 

क्लिक केल्यावर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये बॉटनेट चं आगमन होईल. तुम्ही बॉटनेट च्या नेटवर्किंग ग्रुप मध्ये जोडले जाता. 

एक माणूस लॅपटॉप वापरत आहे असं दाखवलं आहे की तो कुणाची तरी खाजगी माहिती चोरत आहे - सायबर बंधू

किंवा जर तुमच्या एखाद्या मित्राचा जरी कॉम्प्युटर इनफेक्ट झाला आणि त्याच्या कॉम्प्युटरमधील फाइल तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर मध्ये उघडल्या तर तो पण इनफेक्ट होतो. 

तुम्ही नकळत एखाद्या अशा वेबसाइटला भेट दिली जी हॅकर्स चालवतात किंवा त्यात मॅलवेअर घुसला असेल तर ती वेबसाइट लगेच तुमच्या कॉम्प्युटरवर बॉटनेट इंस्टॉल करेल किंवा तुम्ही जरी एखादी फाइल डाउनलोड केली तरी तो इनफेक्ट होईल. 

एकदा का हा मॅलवेअर कॉम्प्युटर मध्ये घुसला की मग हॅकर स्वतःचा काय असेल तो कार्यक्रम करत राहील. अन् तुम्हाला काहीच कळणार पण नाही.

बॉटनेट काय करू शकतो?

  • या एक मॅलवेअर मुळे हॅकर्सला खुला हात मिळतो. या मॅलवेअरच्या मदतीने ते तुमच्या कॉम्प्युटरद्वारे किंवा कॉम्प्युटरवर वेगवेगळे अत्याचार करू शकतात. 
  • हॅकर तुमच्या कॉम्प्युटरवरील सर्व फाइल वाचू शकतो. एवढंच नाही तर नवीन माहिती add करू शकतो. 
  • हे तुमच्या खाजगी माहिती जमा करून ती हॅकरकडे पण पाठवतात. ज्यामध्ये तुमचे यूजरनेम, पासवर्ड, वैद्यकीय माहिती किंवा आर्थिक माहिती यांचा समावेश असू शकतो. 
  • तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा कसा वापर करताय त्यावर काय गोष्टी करताय यावर हॅकर लक्ष ठेवतात. 
  • मी आधी म्हणलंच की या एका मॅलवेअरमुळे त्यांना खुला हात मिळतो. याच्या मदतीने ते इतर मॅलवेअर इंस्टॉल करू शकतात. जसं ransomware, adware, keylogger इत्यादी. 
  • तुमच्या डिवाइससह इतर डिवाइसला पण ते इनफेक्ट करतात. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या घरातील डिवाइस आणि तुमचा डिवाइस अडचणीत येऊ शकतो. 

बॉटनेट च्या मदतीने हल्ले

  • DDoS – याचा फूल फॉर्म Distributed Denial of Service असा आहे. ते botnet ने ग्रासीत सर्व कॉम्प्युटरला एका वेबसाइटवर पाठवतात. ज्याने त्या वेबसाइटचा सर्व्हर क्रॅश होतो. अशाने ते वेबसाइट बंद पाडू शकतात किंवा त्याच्या मालकाकडे पैशाची मागणी करतात. 
  • Spam – यांच्या मदतीने ते bulk मध्ये दुसऱ्यांना स्पॅम ईमेल पाठवू शकतात. याने एक तर ते दुसऱ्याच्या कॉम्प्युटर मध्ये मॅलवेअर इंस्टॉल करतील किंवा फिशिंगच्या मदतीने त्यांना आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात. 
  • हा मॅलवेअर तुमच्या कॉम्प्युटरच्या रिसोर्सेसचा पूर्णपणे फायदा उचलतो. याच्या मदतीने तुमच्या कॉम्प्युटरमधून cryptocurrency mining करतात. ज्यामुळे तुमचा पीसी स्लो होतो शिवाय जास्तीची वीज वापरतो. 

बॉटनेट कॉम्प्युटरमध्ये आहे हे कसं ओळखणार?

  • स्लो इंटरनेट स्पीड अनुभवायला मिळणे 
  • कॉम्प्युटर मधील फाइल अचानक डिलीट होणे 
  • नवीन फाइल दिसत आहेत. 
  • तुमच्या महितीशी छेडछाड झालीय. 
  • बॅकग्राऊंड मधील प्रोसेस तुम्ही करू शकत नाहीयेत. 
  • सॉफ्टवेअर किंवा विंडोज अपडेट करण्यात अडचण 
  • टास्क मॅनेजर मध्ये अनोळखी प्रोसेस चालू आहेत. 

बॉटनेट पासून कसं वाचायचं?

  • सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेट करत रहा. जर अँन्ड्रॉईड आणि विंडोज वापरत असाल तर नियमित अपडेट करा. 
  • अनोळखी फाइल अजिबात उघडू नका. अशा फाइल ईमेल मध्ये किंवा एखाद्या infected वेबसाइटवर पण असू शकतात. 
  • लिंक्स वर पण विचार करूनच क्लिक करा. 
  • फक्त विश्वसनीय वेबसाइटवरूनच फाइल डाउनलोड करा. 
  • torrents मध्ये पण बॉटनेट असू शकतो. 
  • चांगला फायरवाल वापरा याने खूप मदत होईल. तो बॉटनेट ला सर्व्हरशी कनेक्ट करण्यापासून अडवेल. 
  • पासवर्ड साधे वापरू नका. 
  • multi factor authentication चा वापर करा. 
  • चांगला अॅंटीवायरस वापरा. फुकटच्या अॅंटीवायरसवर विश्वास ठेऊ नका. 
  • जर बॉटनेट असल्याची शंका वाटत असेल तर खालील botnet removal tools चा वापर करा. 
  • जास्त सुरक्षेसाठी vpn चा वापर करा. 
  • फक्त तुमचा लॅपटॉप किंवा पीसी नव्हे तर मोबाईल, टॅब्लेट, गेमिंग console इत्यादी गोष्टी याने इनफेक्ट होतात त्यामुळे त्यांना पण सुरक्षित ठेवा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *