फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
सध्या ईमेल पाठवणे किंवा प्राप्त करणे फाइल पाठवणे किंवा साधं काही सर्च जरी करायचं म्हणलं तरी तिथे डाटा ट्रान्सफर करणं हे आजच्या तांत्रिक युगात सगळीकडेचं आलंय. सध्याच्या काळात जिथे सायबर गुन्हेगार हे एखाद्या कंपनीची किंवा व्यक्तीची माहिती मिळवण्यासाठी टपुन बसलेले आहेत तिथे त्यांची माहिती ही सुरक्षित असली पाहिजे. इथेच पहिल्या चरणात AES हे तंत्रज्ञान जन्माला येतं.
मुद्दे
AES हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यात आपली माहिती ही विशिष्ट पद्धतीने लपवली जाते. याला फक्त ज्याने ती महिती त्या पद्धतीने लपवली आहे फक्त तोच वाचू शकतो.
AES चा फूल फॉर्म हा Advanced Encryption System असा आहे. यात symmetric block cipher पद्धतीचा वापर माहिती encrypt करण्यासाठी करतात. म्हणजेच encrypt आणि decrypt करण्यासाठी एकाच key चा वापर होतो. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर जगत सर्वच कंपन्या करतात.
AES काम कसं करतं?
जसे इतर encryption पद्धती करतात तसंच हे माहितीला कोड मध्ये रूपांतरित करतात. तेही एका key च्या माध्यमाने ज्याचा वापर करून याला encrypt आणि decrypt करतात. AES मध्ये याच्यापलीकडे वेगळं काम होतं. यात जे कोड तयार होतात त्यांना त्यांच्या जागेवरून वेगवेगळ्या पद्धतीने हलवलं जातं त्यामुळे ज्याच्याकडे ती key नाही त्याला कशाचाच कशाला मेळ लागणार नाही.
प्रकार
जरी यामध्ये encryption पद्धत आणि decryption पद्धत सारखीच असली तरी याच्या प्रकारानुसार ती थोडी बदलते. खाली दिलेले त्याचे प्रकार आहेत.
AES 128 bit Encryption Method (पद्धत): यात 128 bit key चा वापर केला जातो. ज्यात 10 वेगवेगळ्या पद्धतीने माहिती encrypt केली जाते. ज्यात पण 3.4*10^38 एवढे वेगवेगळे प्रकार येतात.
AES 192 bit Encryption Method (पद्धत): यात 192 bit key चा वापर केला जातो. ज्यात 12 वेगवेगळ्या पद्धतीने माहिती encrypt केली जाते. ज्यात पण 6.2*10^57 एवढे वेगवेगळे प्रकार येतात.
AES 256 bit Encryption Method (पद्धत): यात 256 bit key चा वापर केला जातो. ज्यात 14 वेगवेगळ्या पद्धतीने माहिती encrypt केली जाते. ज्यात पण 1.1*10^77 एवढे वेगवेगळे प्रकार येतात.
पण एवढे प्रकार का?
यांचा वापर कशासाठी केला जातो त्यावर हे अवलंबून आहे. AES 256 हे सगळ्यात अवघड encryption पद्धत आहे. त्यामुळे याला जास्त प्रोसेसिंग पॉवर, वेळ आणि संसाधन लागतात. त्यामुळे याचा वापर सरकारी कामासाठी जास्त होतो. पण जर एखादी अॅप मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवायची असेल तर त्यासाठी AES 128 चा वापर केला जातो.
ही पद्धत खालील प्रकारे काम करते.
Division and Expansion
यात तुम्ही जो काही मेसेज पाठवू इच्छिता त्याला blocks ऑफ bits किंवा rows मध्ये विभागतात (division) मग त्याला AES च्या मदतीने expand करतात. यात एक encryption key किंवा round key पण यात add हेतो.
Substitution
यात प्लेन टेक्स्ट ला encrypted टेक्स्ट मध्ये रूपांतरित करतात.
Shifting
वरील encrypted टेक्स्ट हे ओळीत आहेत त्यांना एक घराने पुढे सरकवतात. फक्त पहिली ओळ ही जशास तशी असते.
Mixing
आता encrypted आणि सरकवलेल्या ओळींना मिसळलं जातं असं केल्याने कोणत्याही हॅकरला फक्त ओळी सरकवण्याचं काम राहणार नाही.
Round Key
पहिल्यांदा जी राऊंड की तयार केली होती, त्याच्या मदतीने परत एकदा या खिचडीला encrypt केलं जातं.
Repeat
आता वरील सर्व कृत्या परत केल्या जातात. हे कोणती पद्धत (128,192,256) वापरली जाते यावर आधारित आहे त्याच्यानुसार केलं जातं. म्हणजे 128 बीट encryption साठी 10 राऊंड केले जातात.
- व्हीपीएन चे फायदे आणि तोटे
- रॅंसमवेअर म्हणजे काय?
- पासवर्ड मॅनेजर म्हणजे काय?
- सोशल इंजीनीयरिंग म्हणजे काय?
फायदे
सुरक्षा :- जर एखादा हॅकर brute force पद्धतीने सगळ्या कमी सुरक्षा असलेल्या AES 128 encryption पद्धत मोडून काढायचा प्रयत्न करत असेल तर त्याला 1 अब्ज अब्ज वर्ष लागतील आणि दोन वेळा अब्ज लिहिलेला आहे ती कोणतीही चूक नाही.
किंमत :- AES encryption पद्धत ही फुकट आहे
सरलता :- ही पद्धत वापरण्यास खूप सोपी आहे. त्यामुळे कोणीही याचा वापर करू शकतो.
स्पीड :- अजून वेगवेगळ्या encryption पद्धती आहेत पण AES ची स्पीड सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे हे लवकर encrypt आणि key असेल तर decrypt पण करता येते.
वापर
खरं तर ही पद्धत अमेरिकन सरकारसाठी तयार करण्यात आली होती. त्यावेळी काही हॅकर नी मिळून अमेरिकन सरकारचे महत्वाचे कागदपत्रे brute force च्या मदतीने हॅक केली होती. त्यामुळे त्यावेळी या पद्धतीचा शोध लावण्यात आला होता. पण सध्या ही पद्धत नागरिकांना मिळणाऱ्या इतर सुविधांसाठी पण वापरली जाते.
व्हीपीएन
व्हीपीएन चं काम हे सुरक्षित आणि प्रायवेट ब्राऊजिंग करण्यासाठी आहे. यात व्हीपीएन हे वेगवेगळ्या सर्व्हरशी आपल्याला जोडतो. ज्यात आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी या AES चा वापर केला जातो. पासवर्ड मॅनेजर, वायफाय, मोबाईल apps ज्या मेससेजिंग. फोटो शेरिंग अॅप्स आहेत त्या याचाच वापर करतात.
Leave a Reply