व्हीपीएन चे फायदे आणि तोटे | Pros and Cons of VPN in Marathi

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

व्हीपीएन  म्हणजे काय?

याचा फुल फॉर्म व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असा आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयपी अॅड्रेस लपवू शकता आणि इतर देशातील कंटेंट पाहू शकता. अशाने कोणालाच कळणार नाही की तुम्ही काय करत आहात फक्त तो व्हीपीएन चांगला असला पाहिजे.

यात एक मोबाइल दाखवला आहे जो व्हीपीएन शी जुडलेला आहे. -सायबर बंधू
व्हीपीएन चे फायदे आणि नुकसान

नेटवर्क सुरक्षा  

तुम्ही जर विना व्हीपीएन  इंटरनेट वापरत असाल तेही कसलाही विचार न करता कोणत्याही वेबसाइट किंवा लिंकवर क्लिक करत असाल तर तुमचा मोबाईल आजिबात सुरक्षित नाही. तुमचा मोबाईल आणि तुमची माहिती हॅकर्ससाठी उघड आहे. 

काही वेबसाइट्स या तुम्हाला ट्रॅक करत असतात. जेणेकरून ते तुम्हाला अॅड्स दाखवू शकतील. तर काहींची मजल यापलीकडे गेलेली असते. ते आपले पासवर्डस्, यूजरनेम आणि इतर माहिती चोरत असतात. 

आयपी अॅड्रेस बदलणे

व्हीपीएन च्या मदतीने तुमचा आयपी अॅड्रेस लपवू शकता असं केल्याने वेबसाइट तुमचा वायफाय तुमची सिम कंपनी तुम्ही ऑनलाइन काय करत आहात याबद्दल त्यांना काहीच कळणार नाही. शिवाय हॅकर्सला पण काहीच कळणार नाही. त्यांना तुमच्या बद्दल पण काहीच कळणार नाही. त्यांना फक्त त्या व्हीपीएन च्या सर्व्हर चा डाटा दिसेल. व्हीपीएन आपली माहिती जशी नावं, पत्ता, पासवर्डस् आणि क्रेडिट कार्ड नंबर हे encrypt करत असतो ज्याने हॅकरला ही माहिती दिसत नाही. 

a person wearing goggle whose left side of face is black and other side is white on left side of goggle there is text "192.85.69.30" and on right side "69.68.25.333"

डेटा थ्रॉटलिंग 

काही इंटरनेट सर्विस प्रोवायडर्स (ISP) जसे वायफाय वाले किंवा आपल्या सिम कंपन्या या आपल्यावर काही मर्यादा टाकतात. यात समजा तुम्हाला दिवसाला 1.5 जीबी इंटरनेट मिळतं त्यापैकी जर कंपनीची अशी पॉलिसी असेल की फक्त 1 जीबी इंटरनेट तुम्ही यूट्यूब विडियो साठी किंवा इतर कोणतंही विडियो पाहण्यासाठीच वापरू शकता. मग जीबी संपल्यानंतर कंपनी तुमचा स्पीड कमी करते. याला डाटा throttling म्हणतात. 

यातून वाचण्यासाठी तुम्ही व्हीपीएन  चा वापर करू शकतात. असं केल्यानं कंपनीला काहीच कळणार नाही की तुम्ही काय करायलात. मग 1 जीबी डाटा संपल्यावर पण तुम्ही विडियो पाहण्यासाठी इंटरनेट वापरू शकता. कंपनीला काहीच कळणार नाही मग ते इंटरनेट स्लो करणार नाहीत. 

बॅंडविड्थ थ्रॉटलिंग 

हे यापेक्षा जरा वेगळं आहे. यात समजा तुम्ही ऑनलाइन गेम खेळत आहात. यात तुम्हाला हायस्पीड इंटरनेट ची गरज असते आणि त्याचवेळी त्याच नेटवर्क वर इतर लोकं पण गेम खेळत आहेत मग अशाने कंपनीच्या इंटरनेटवर खूप ताण येतो. म्हणून कंपनी काही जणांचं इंटरनेट स्लो करते. जर तुम्ही कधी लॉकडाऊनच्या वेळी पबजी खेळला असेल तर तुम्हाला लॅग काय असेल हे माहीतच असेल. ते याच कारणामुळे झालं असेल. 

अशावेळी व्हीपीएन  वापरू शकता. याने कंपनीला काहीच कळणार नाही. अन् तुम्ही विना अडथळा इंटरनेट वापरू शकता. 

ब्लॉक्ड कंटेंट अॅक्सेस

यात काही देश हे वेबसाइट्स ब्लॉक करत असतात. अशावेळी जर तुम्हाला त्या देशात राहून सध्या सिमच्या इंटेरनेटने ती वेबसाइट वापरायची असेल तर ते शक्य नाही पण तुम्ही व्हीपीएन  चा वापर करून त्या वेबसाइट बिनधास्तापणे वापरू शकता. याचं उदा. म्हणजे netflix वर काही चित्रपट हे भारतात पाहता येत नाहीत मग अशावेळी व्हीपीएन  कामाचा आहे. 

ट्रॅकिंग पासून सुरक्षा

तुम्ही ज्या कंपनीचा इंटरनेट(ISP) वापरता ती कंपनी तुम्ही काय करता हे पाहू शकते. तुम्ही कोणत्या वेबसाइटला भेट दिली हे ती कंपनी पाहू शकते. याचा वापर तुम्हाला ads दाखवण्यासाठी केला जातो. यासाठी पण व्हीपीएन  वापर करून वाचू शकता. 

DDoS हल्ल्यापासून सुरक्षा 

एखादा हॅकर तुम्हाला एखादी सर्विस वापरण्यापासून रोखू शकतो. जर त्याला तुमचा आयपी अॅड्रेस मिळाला तर तो हे करू शकतो. जसं तुम्ही ऑनलाइन गेमिंग करत आहात अशावेळी ddos अटॅकने तुम्ही तो गेम खेळू शकणार नाहीत. मग व्हीपीएन चा वापर केल्याने तुमचा आयपी अॅड्रेस लपवला जातो. अशाने सगळा लोड हा सर्व्हर वर होतो. आणि तुम्ही विनाकाळजी गेम खेळू शकता.   

पब्लिक वायफाय सुरक्षा 

ज्यावेळी तुम्ही पब्लिक वायफायला कनेक्ट करता अशावेळी तुमच्या मोबाईल मधील माहिती ही एखादा हॅकर सहज पाहू शकतो. तुमचे फोटोस, फेसबूक, इंस्टाग्राम वरील तुमचे मेसेजेस हे पण तो वाचू शकतो. अशावेळी एक चांगला व्हीपीएन  तुमची सर्व माहिती encrypt करतो. मग हॅकर काहीही करू शकणार नाही.   

wifi icon

व्हीपीएन  जोडा पैसे वाचवा

कूकीस हा शब्द तुम्ही अनेकदा कोणत्या न कोणत्या वेबसाइटवर नक्की वाचला असेल याच्या मदतीने ते तुम्हाला ट्रॅक करत असतात. 

याच्या मदतीने काही कंपन्या जशा विमानचे तिकीट बूक करणाऱ्या वेबसाइट या जर तुम्ही दरवेळी त्यांच्या वेबसाइटवर जाऊन किंमत बघत असाल तर टी प्रत्येक वेळी वाढलेली दिसू शकते. मग अशा वेळी ब्राऊजर हिस्टरी, cookies क्लियर करा आणि व्हीपीएन ला कनेक्ट करा मग वेबसाइट वर जा अशावेळी तुम्हाला फरक दिसू शकतो. 

तोटे 

एंक्रिप्शन पद्धत

तुम्ही जर एखादं मोफत किंवा अगदी स्वस्तातलं व्हीपीएन  वापरात असाल तर त्यात काही ना काही कमी नक्की असू शकते. त्यापैकी एक म्हणजे encryption पद्धत वापरत असेल तर हॅकर लवकर तुमची माहिती करू शकतो. त्यामुळे AES पद्धत वापरणारं व्हीपीएन  वापरा. 

सर्व्हर इनफ्रास्ट्रक्चर

त्या कंपनीचे मल्टिपल सर्व्हर्स असायला हवेत. strong encryption, customer service, no logs policy, country of operation यात काही देशांचे काही नियम असतात. जसं अमेरिका ही त्यांच्या देशात जर सर्व्हर असेल तर त्याचा डाटा कधीही मागू शकते.

स्लो स्पीड

यात आपली माहिती ही encypt होत असते. त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. परिणामी इंटरनेटचा स्पीड स्लो होतो. किंवा जर कधी सर्व्हर वर जास्त लोड असेल तर मग स्पीड कमी होत असतो. 

ब्लॉकर

काही सॉफ्टवेअर्स असतात जे वेबसाइट किंवा एखादी अॅप वापरण्यापासून अडवतात. त्यामुळे अशा वेबसाइटवर हे काम करत नाहीत. 

कायदा

काही देशांत याच्यावर बंदी आहे. जसं चीन मध्ये याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. पण भारतात यावर काही बंदी नाही त्यामुळे निश्चिंतपणे वापरू शकता. 

ड्रॉप्ड कनेक्शन

कधी कधी याचे चे कनेक्शन अचानक तुटू शकते याचं कारण वायफाय किंवा सिम असू शकतं. मग अशा वेळी आपली सगळी माहिती असुरक्षित होते. यासाठी व्हीपीएन मध्ये किल स्विच नावाचं फीचर असलं पाहिजे. 

मोफत

जर तुम्ही व्हीपीएन वापरताय आणि त्यात जर ads दिसत असतील आणि तेही तुमच्या सर्च नुसार तर समजून जा तो वापरण्याचा काहीच फायदा नाही. व्हीपीएन निवडताना त्यांच्या पॉलिसीत नो लॉग पॉलिसी आहे की नाही हे नक्की बघा. 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *