फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
तुमचा पॅन किंवा आधार क्रमांक अजिबात सेव्ह केला जात नाही
PAN-AADHAR LEAK CHECKER
डार्क वेब वर खूप लोकांची माहिती ही मोफत उपलब्ध आहे माझ्याजवळ तो डेटाबेस आहे तुम्ही तुमचा पॅन किंवा आधार क्रमांक त्या डेटाबेस मध्ये आहे की नाही ते या टूलच्या मदतीने पाहू शकता.
दुरुपयोग
तुमच्या पॅन कार्डचा दुरुपयोग होत आहे असं वाटत असेल तर मग तुम्ही क्रेडिट स्कोर किंवा सीबील स्कोर तपासू शकता जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल आणि तुम्ही त्याचे हफ्ते वेळेवर फेडत असाल तर सीबील स्कोर चांगला राहील आणि जर दुसऱ्यानं तुमच्या पॅन कार्ड वर लोन घेतलं असेल तर मग तो फेडणारच नाही त्यामुळे तुमचं सीबील स्कोर खराब होतो. यावरून तुम्ही ठरवू शकता की पॅन कार्डचा दुरुपयोग होतोय की नाही.
बेकायदेशीर दागिन्यांची खरेदी
भारतात एका मर्यादेच्या बाहेर दागिने खरेदी करण्यासाठी पॅन कार्डचा वापर होतो त्यामुळे स्कॅमर दागिने खरेदी करण्यासाठी तुमच्या पॅन कार्डचा पण वापर करू शकतो.
हॉटेल रूम आणि गाड्या
जेव्हा तुम्ही एखादी हॉटेल रूम भाड्याने घेता तेव्हा तुम्हाला एक पुरावा द्यावा लागतो आशा ठिकाणी स्कॅमर तुमचा पॅन कार्ड देऊ शकतो. आणि आशा हॉटेलमधील त्या खोलीत जर काही गुन्हा घडला तर मग पोलीस तुमच्याच दारात येतील.
हाच प्रकार एखादी गाडी भाड्याने घेताना पण होऊ शकतो
तक्रार
केंद्र सरकारने ‘आयकर संपर्क केंद्र’ या नावाने वेबसाइट चालू केली आहे यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
जर तुमचा एखादा ईमेल ब्रीच झाला असेल तर मग लगेच पासवर्ड बदला. ज्या ठिकाणी पण हा ईमेल वापरला असेल त्या अकाऊंटचा पण पासवर्ड लगेच बदला. किमान दर महिन्याला किंवा तीन महिन्यातून एकदा पासवर्ड बदलत रहा. पासवर्ड लक्षात राहत नसतील तर मग पासवर्ड मॅनेजर वापरा. टू स्टेप वेरीफिकेशनचा वापर नक्की करा. सध्या काही वेबसाइट पासकीजचा वापर करत आहेत तुम्ही पण यांचा वापर नक्की करा.